मुंबई : देशभरात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यात राज्यातील पुणे आणि नागपुरात सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या परदेशातून येणा?्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. विदभार्तील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता येथून मुंबईत येणा?्या नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. मुंबईतील परेल, मुंबई सेंट्रल, बोरीवली, कुर्ला या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तपासणी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. विदभार्तून येणा?्या नागरिकांचीही तपासणी करण्यात येईल. त्यानुसार अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातून येणार्या प्रवाशांची मुंबईत तपासणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातही कोरोनाचा कहर वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारकडूनही वारंवार मास्क लावण्याचं आवाहन केलं जात आहे.
Contents
hide
Related Stories
November 4, 2024
November 2, 2024