दिग्रस : दिग्रस तालुक्यातील राहटी येथे नदीच्या काठावर आंब्याच्या झाडाजवळ विजयी उमेदवारांनी पार्टी आयोजित केली होती या पार्टीमध्ये तू जेवणाला का आला या वादातून एकाने धारधार सुरी फेकून मारल्याने छातीत सुरी खुपसल्याने खून झाल्याची बाब बुधवार, दि.२0 जानेवारी २0२१ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.या घटनेची वार्ता काही क्षणातच वार्यासारखी पसरताच नागरिकांनी दिग्रस पोलिस स्टेशनला गर्दी केली.
सविस्तर वृत्त असे की, राहटी येथील रामकिसन गव्हाणे यांच्या शेतात जेवणाचा कार्यक्रम होता. तेव्हा या कार्यक्रमात १0 ते १५ लोक होते. यावेळी मृतक कोंडबा लक्ष्मण हटकर (वय -३६) व आरोपी विश्वास संदीप गव्हाणे (वय-२५) रा.राहटी हे दोन्ही जेवणाकरिता समोरासमोर बसले होते. जेवण करीत असताना त्या दोघांमध्ये तू जेवणाकरिता येथे का आला या कारणावरून बोलत असतांना त्यात वाद निर्माण झाला.
एकमेकांना शिवीगाळ करू लागले तेवढय़ात आरोपी विश्वास संदीप गव्हाणे याने कोंबडी कापण्याकरिता आणलेली धारधार सुरी हातात घेऊन त्याच्या समोर जेवणाकरिता बसलेला मृतक कोंडबा हटकर याला फेकून मारली. तेव्हा मृतकाच्या डाव्या बाजूच्या छातीत जाऊन घुसली तेव्हा त्याच्या छातीत धारधार सुरी फेकून मारून गंभीर जखमी केले. तेव्हा छातीतून अति रक्तस्त्राव चालू होता. तेव्हा तेथे जेवणाकरिता बसलेल्या लोकांच्या मदतीने लगेच धारधार सुरी बाहेर काढली व मृतकाच्या छातीला कपडा बांधून जेवणाचा कार्यक्रम सोडून मृतक कोंडबा हटकर याला दुचाकीवर बसवून दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंह चंदेल व दिग्रस पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले ,सहाय्यक पोलिस निरीक्षक धीरेंद्रसिंह बिलवाल यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोलिस ताफासह पोहचून घटनास्थळाची पाहणी केली.या प्रकरणी दिग्रस पोलिसात फिर्यादी प्रदीप सुखदेव पवार (वय ३२) रा.पंचाळा ता.मानोरा याने तक्रार दिली असून आरोपी विश्वास संदीप गव्हाणे (वय २५) रा.राहटी यांच्यावर भादंवि कलम ३0२, ५0४ नुसार खुनाचा गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.
Related Stories
December 2, 2023