जाणे वारकरी
भक्तांना आधार
विठ्ठलाच्या दारी !!
भजन कीर्तन
नाम विठोबाचे
नाचत गर्जत
विठ्ठल भक्तांचे !!
दूरवर पायी
चालतात भक्त
ना चिंता ना भुक
गुणगान फक्त !!
जो करेल वारी
ही एकदा तरी
सताजन्माची हो
पुण्याई ती खरी !!
तन मन धन
चरणी अर्पुन
विठ्ठल देईल
भक्तांना दर्शन !!
पांडुरंगा जीव
आहे तुझ्यावरी
वारीची पुण्याई
तुझी भक्तांवरी !!
– हर्षा वाघमारे
नागपूर ✍️