- * दिव्यांग बांधवांनी मानले आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार !
- * आ. देवेंद्र भुयार यांच्या पुढाकारामुळे शेकडो दिव्यांग बांधवांना मिळाला दिलासा !
वरुड तालुका प्रतिनिधी : शेतकरी भवन कार्यालय वरुड येथे दिव्यांग बांधवांना आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते १०१ दिव्यांग बांधवांना मोफत “कृत्रिम अवयव” वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अनेक दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय विकत घेणे शक्य होत नाही ही बाब लक्षात घेत आमदार देवेंद्र भुयार यांनी वरूड येथे आमदार देवेंद्र भुयार मित्र मंडळ व वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जून रोजी मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या १०१ लाभार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून हात-पायांचे माप घेण्यात आली होती.
दुर्घटनेत हात-पाय गमावणारे, मधुमेहाने त्रस्त, रक्तवाहिनींच्या विकाराने पीडित व्यक्ती आणि गँगरीन झालेल्या व्यक्ती सर्वसामान्य जीवन जगण्यात असमर्थ असतात. अशा व्यक्ती कृत्रिम हात-पायांच्या सहाय्याने सामान्य जीवन जगू शकतात. सर्वसामान्यांप्रमाणे चालू फिरू शकतात. सर्व कामकाज करू शकतात. एवढेच नव्हेतर सायकल, रिक्षा चालवू शकतात. त्यांना पळता, खेळताही येते. तसेच नृत्यही करता येते. आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नाने या शिबिरातून अपंग नागरिकांना सामान्य जीवन जगण्याची मदत तसेच उमेद मिळाली असून शेकडो अपंग बांधवांना दिलासा मिळाला आहे.
वेगवेगळ्या अपघातांत हात किंवा पाय गमावलेल्यांच्या आयुष्यात नवी उमेद जागविण्याचे काम मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार करत असून दिव्यांगांना आधार देण्यासाठी कृत्रिम अवयव व सहायक साधने देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार मित्र परिवार व साधू वासवाणी मिशन यांनी पुढाकार घेतला आहे. या शिबिराच्या माध्यमातून शेकडो दिव्यांग गरजूंची तपासणी करून मोठ्या प्रमाणात साहित्य देण्याचे लक्ष हाती घेण्यात आले होते.
दिनांक १० जुलै रोजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकारामुळे या भव्य शिबिराच्या माध्यमातून शेकडो अपंग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय बसविण्यात आले असल्यामुळे १०१ दिव्यांग व्यक्तींना निश्चितच जगण्यासाठी नवी उभारी मिळेल असा विश्वास आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी व्यक्त केला असून शेकडो दिव्यांग बांधवांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.
या शिबिराचे उदघाटन आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रामेशपंत वडस्कर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरुड तालुका अध्यक्ष बाळू कोहळे पाटील, महेंद्र देशमुख, संजय चक्रपाणी, तुषार देशमुख, प्रवीण देशमुख, मोर्शी तालुका अध्यक्ष बंडू जिचकार, माजी सभापती निलेश मगर्दे, साधू वासवानी मिशनचे प्रकल्प अधिकारी मिलिंद जाधव, राजाभाऊ कुकडे, रोशन दरोकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष हर्षल गलबले, युवक मोर्शी शहर अध्यक्ष अंकुश घारड, प्रवीण देशमुख, समीर गौस अली, किशोर गोमकाळे, प्रभाकर राऊत, राजू सिरस्कर, अभिजित चव्हाण, संकेत यावलकर, राजेंद्र घाटोळे, ज्ञानेश्वर यावले, संजय थेटे, सुरजुसे सर, अशोक दारोकर, यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.
- —————-
मतदार संघामध्ये मोफत कृत्रिम पाय व हात वाटप शिबिर आयोजित केल्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना अद्यावत तंत्रज्ञानाने बनविलेले कृत्रिम हात व पाय फायबरचे असून वजनास अत्यंत हलके टिकावू व मजबूत असून प्रत्यारोपण केल्यानंतर अपंग व्यक्ती चालू शकते, सायकल चालवू शकते, टेकडी सुध्दा चढू शकते तसेच सर्व दैनंदिन कामे करू शकते. सर्व वयोगटातील पुरुष आणि स्त्री रूग्णांचे मधुमेहामुळे, गेंगरीनमुळे किंवा कुठल्याही प्रकारच्या अपघातामुळे हात व पाय गमावले गेले असतील अशा सर्व रुग्णांची तपासणी करून त्या सर्व दिव्यांग बांधवांना मोफत हात पाय बसविण्यात आले असून शेकडो दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला.
- – आमदार देवेंद्र भुयार