वजन कमी करण्यासाठी काही भाज्या किंवा फळं आवर्जून टाळली जातात. या यादीत बटाट्याचाही समावेश होतो. पण याच बटाट्यात वजन कमी करण्याचीही क्षमता असते हे जाणून घ्यायला हवं. यात न विरघळणारं आणि विरघळणारं असं दोन्ही प्रकारचं फायबर असतं. यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही. यासाठी बटाटा सालांसकट खायला हवा. बटाट्यासोबत वजन कमी करण्यास मदत करणार्या इतर काही घटकांबद्दल जाणून घेऊ. वजन कमी करायचं असेल तर पालक खायला हवा. इतर हिरव्या भाज्यांच्या तुलनेत पालकात वजन कमी करण्याची जास्त क्षमता असते. यात अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाणही खूप जास्त असतं. यामुळे ऊर्जाही मिळते. मांसाहार करणार्यांनी कॅलरींचं प्रमाण कमी करण्यासाठी गाजर उकडून किंवा भाजून खावं. थंडीत मिळणार्या कांद्यांमध्ये क्रोमियमचं प्रमाण बरंच जास्त असतं. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यासोबतच क्रोमियममुळे शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रणात राहतं. शिलगम नावाची एक भाजी मिळते. जांभळट, पांढरट रंगाच्या या भाजीत फायबर आणि पाण्याचं प्रमाण बरंच जास्त असतं. यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. अतिखाणं टाळायचं असेल तर आहारात शिलगमचा समावेश करायला हवा.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023