Skip to content
नित्य स्मरणार । कर्म तिचे ।।
पांग फेडण्यास । प्राणही देईल ।
चरणी होईल । लिन तिच्या ।।
माझ्या वर्तनाने । दुनिया आनंदी ।
होईल स्वच्छंदी । पाखरेही ।।
वचन गुरुला । शिष्य आज देतो ।
आशीर्वाद घेतो । झुकूनिया ।।
ज्ञानाचा वापर । जनहितासाठी ।
नित्य सत्यासाठी । करणार ।।
बहिणीला माझा । वचन असेल ।
प्रेमात नसेल । स्वार्थ माझा ।।
मजला संयम । तिच्यामुळे ।।
तिने कष्ट केले । म्हणून शिकलो ।
माझे मित्र सदा । पाठीशी राहले ।
त्यांनाही वचन । आजच्या घडीला ।
भुलने प्रितीला । त्यांच्या नाही ।।
मानतो बहीण । जिला मनातून ।Vजाईल मरून । तिच्यासाठी ।।
माझ्या मैत्रिणीला । सुखी ठेवणार ।
देशहितासाठी । झटत राहील ।
आयुष्य वाहील । देशासाठी ।।
अजुचे वचन । म्हणजे जीवन ।
Post Views: 88
Like this:
Like Loading...