- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त दांपत्य संपर्क पंधरवडा व लोकसंख्या स्थिरता पंधरवडा राबविण्यात येत आहे. ‘कुटुंब नियोजनाच्या उपायांचा अवलंब करा, प्रगतीचा एक नविन अध्याय लिहा’ असे उपक्रमाचे घोषवाक्य आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे यांनी दिली.
नुकताच इर्विन रूग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात एक जनजागृतीपर कार्यक्रमही झाला. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेंद्र सोळंके, अधिसेविका ललिता अटाळकर, परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या शितल यावले, पाठ्यनिर्देशिका ममता चिंचोले, आहारतज्ज्ञ कविता देशमुख, परिसेविका संगीता पेंदाम, अधिपरिचारिका सिंधुताई खानंदे, प्रभाताई वानखडे, कविता ढोबळे, मनीषा गावंडे आदी उपस्थित होते.
‘लोकसंख्या स्थिरता पंधरवड्या’त परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पोस्टर प्रदर्शन उपक्रमात सहभाग घेतली. सायली खडगी, साक्षी कापगडे, कोमन बोदडे यांनी लोकसंख्यादिनावर आधारित पोस्टर्स तयार केली. भाग्यश्री घोटेकर, निकिता कांबळे, पूनम घायवट यांनी संदेश देणारी रांगोळी काढली. ललिता बंगाली, प्रतिक्षा मालाधारी यांनी आरोग्य माहिती सादर केली. कुटुंब नियोजन साधनांच्या साहित्याचे प्रदर्शनही भरविण्यात आले. श्रेया चौधरी, इशा गवई, वैष्णवी घेलगे, ऐश्वर्या कोकणे, देवयानी माहुरे, पुनम सानप, संगिता चंडेले, योगमाया नंदागवळी यांनी जनजागृतीपर माहिती दिली.
- (छाया : संग्रहित)