अमरावती- (प्रतिनिधी)-भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या राज्यपाल नामित सिनेट सदस्य डॉ.मनीष शंकरराव गवई हे नुकतीच संपन्न झालेल्या सिनेट सभेत विद्यार्थी प्रश्नावर आक्रमक झाले होते. सिनेट सभेदरम्यान डॉ. मनीष गवई यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करण्यात आला व विद्यार्थी हितांच्या विविध प्रश्नावर बोलण्यास रोखण्यात आले. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा असल्याचे त्यानी वारवार सांगितले व सिनेट सभेने मला बोलण्यास अधिकार दिला असल्याचे सागून तरीही दबाव तंत्राला न जुमानता विद्यार्थी प्रश्नावर सभेत प्रश्न व प्रस्ताव मांडले.
विद्यापीठ व शैक्षणिक वर्तुळातील प्रश्न सोडविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सिनेट सद्स्यावर असते. सिनेटची सभा विद्यापीठ व विद्यार्थी हिताला जोपासण्याचे काम करीत असते. या सभागृहात विविध सवर्गातून प्रतिनिधित्व दिल्या जात असते. राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणुन डॉ.मनीष गवई यांची विद्यार्थी प्रतिनिधिच्या स्वरूपात निवड करण्यात आली असल्याने सिनेटच्या सभेत विद्यार्थी प्रश्नावर विद्यापीठाचे लक्ष्य केंद्रित करण्याची भूमिका त्यांच्यावर आहे. अतिशय वादग्रस्त ठरलेल्या या सभेत वारवर डॉ.गवई हे विद्यार्थी हिताची बाजू मांडताना दिसत होते. सुरुवातीला ऑनलाइन सभेमध्ये तांत्रिक करनामुले डॉ.गवई याना सहभागी होता येत नव्हते ज्याची रितसर तक्रार कुलगुरुकड़े करण्यात आली परंतु काही सदस्यानी डॉ.गवई याना हटकले,ज्यामधे चांगलीच शाब्दिक चकमक झाली.दरम्यान डॉ.गवई यांचा माइक चालू बंद होत होता ज्यावर कुलगुरुनी तत्काल त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले. विद्यार्थी प्रश्न व प्रस्ताव अधिसभेत माडत असतानाही काही सद्स्यानी डॉ.मनीष गवईच का सिनेट सभेट बोलत असतात, विद्यार्थी हितांच्या प्रश्नावर तेच का बोलतात यावर आक्षेप घेतला जो आक्षेप विद्यापीठ कायद्यानुसार नव्हता. यावर त्यानी लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असून सिनेट सभेने मला बोलण्यास अधिकार दिला असल्याचे स्पस्थ केले. यावेली सिनेट सभेत डॉ. मनीष गवई यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करण्यात आला. काही सदस्यानी डॉ. गवई यावर अरेरावी केली. काही काल चांगलाच गोंधल उड़ाला. ज्यावर कुलगुरुनी मद्यस्तता करत हा वाद शमवला.विद्यार्थी प्रश्नावर आक्रमक होत विद्यापीठामध्ये विध्यार्थ्यांचे निकालाबाबत महत्वपूर्ण सूचना डॉ. गवई यानी मांडली की महाविद्यालयाची अशैक्षणिक कामे शिक्षकेतर कर्मचार्ल्याना देण्यात यावे, विशेष करुन विध्यार्थ्याच्या आरोग्य विमा प्रस्तावावर सकारात्मक चर्चा घडून महत्वपूर्ण प्रस्ताव अधिसभेत माडला ज्याचा लाभ विध्यार्थ्याना भविष्यात दुर्धर आजाराबाबत मिलनार आहे.याशिवाय दिलीप ऊईके या अनुसूचित जातीतील विध्यार्थ्याच्या पीएचडी प्रवेशाबाबत झालेल्या अन्यायवर विद्यापीठाने केलेल्या कार्यवाहीबाबत प्रश्न विचाण्यात आला. प्रा.विक्रम खोंडे रसायनशात्र विभाग जे. डी.सांगलूदकर महाविद्यालय दर्यापुर यांचे संदर्भात व श्री. दिलीप ऊईके या विद्यार्थ्यच्या पीएचडी प्रवेशाबाबतच्या गठित समितिचा अहवाल अप्राप्त असल्याबाबत या महत्वाच्या समित्यांचे अहवाल कधी जाहीर होणारं हा खड़ा सवाल डॉ. गवई यानी सभागृहात उपस्थित केला. त्यावर सभेत चांगलाच गोंधल उड़ाला. सौ.सुलभ पाटील यांच्या विमान प्रवासाची चौकशी समितीच्या अहवालावर आपली आक्रमक भूमिका डॉ. गवई यानी मांडली.ज्यामधे चौकशीच्या अध्यक्षानी उलट डॉ. गवईवरभडकले. डॉ. गवई यांच्यावर आगपखड़ केली.तेच नेहमी नेहमी बोलतात,तुम्हालच बोलतायेते का,तुम्ही आतापर्यंत खूप बोलले असा टोलाही लावला.विशेष करून भारतीय संविधानाचा अभ्याक्रमात सहभाग करणे याविषयावर पुणे विद्यापीठ व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या धरतीवर हा विषय सर्व शाखा अनिवार्य करावा, विध्यार्थ्यांना विद्यापीठात न येता घरूनच आपल्या मोबाइल वरून पेमेंट गेटवे सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी डॉ. गवई यानी मागील सीनेट सभेत केली होती ज्यावर वित्त विभागाच्या संथ गती वरील कार्यवाहीवर डॉ. गवई यानी नाराजी व्यक्त केली , वाढीव रासेयो पुरस्कार लागू करने, उन्नत भारत अभियानाची अमलबजावणी प्रभावीपने करून विद्यापीठाशी सर्व म्हाविद्यालय रजिस्ट करने,आशीष ठाकरे यानी दिलेल्या एमबीएच्या विध्यार्थ्यांचे प्रमाणपत्र गायब होण्याबाबत निवेदनावर पोलिसात तक्रार देण्याची व संबंधितावर कार्यवाही करण्याची मागनी डॉ. गवई यानी केली याबाबत तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन कुलगुरुकडून मिळाल्याने डॉ. गवई शांत झाले. आपल्यावर वापरल्या गेलेल्या दबाव तंत्राचा व आपली भावना दुखावल्याबाबतचे निवेदन डॉ. गवई यानी कुलगुरूना दिले असून भविष्यात कुलगुरूकडून सुरक्षिततेची हमी मिळाल्याशिवाय आगामी सिनेट सभेत सहभागी होणार नसल्याचे डॉ. गवई यानी स्पस्थ केले.त्यांच्या या भूमिकेचे विध्यार्थी संघटना व पालकानी अभिनंदन केले आहे.
Related Stories
December 2, 2023