अमरावती : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करतांना आ. सुलभाताई खोडके यांनी कोरोना संकट काळात विविध आव्हाने पेलून अनेक योजनेच्या माध्यमातून चांगले काम करणार्या महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन केले . राज्य सरकारने लागू केलेल्या पहिल्या टप्प्यातील लॉकडाउन नंतर राज्यात सरकाने ज्या उपाययोजना केल्या त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येऊन अर्थ चक्राला देखील गती मिळाली . राज्यासह अमरावतीमध्ये कोरोना विरुद्ध लढत असतांना आरोग्य विभागाचे डॉक्टर , नर्स , आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर,सफाई कामगार , जिल्हाधिकारी व त्यांचे अधिनस्त अधिकारी कर्मचारी , महापालिका आयुक्त व त्यांचे अधिनस्त अधिकारी व कर्मचारी महसूल यंत्रणा ,पोलीस आयुक्त तसेच पोलीस यंत्रणेचे अधिकारी व पोलीस कर्मचारी आदीनी कोरोना संकट काळात चांगले काम करून ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी चांगले काम गेल्या बद्दल देखील आ. सुलभाताई खोडके यांनी राज्यविधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्यांचे अभिनंदन केले . मात्र गेल्या १५ दिवसापासून अमरावतीत कोरोना प्रतिबंधासाठी लागू असलेल्या लॉक डाउन संदर्भात आ. सुलभा खोडके यांनी अधिवेशनात नाराजी व्यक्त केली. लॉकडाउन ला घेऊन एकाच दिवशी स्थानिक प्राधिकरणीने तीन आदेश काढून जनतेत संभ्रम निर्माण केला असल्याचे सांगून आ.सुलभा खोडके यांनी अधिवेधनात आपली भूमिका मांडली. अमरावती मधील कोरोना संदर्भातल्या बदलत्या परिस्थितीवर भाष्य करतांना आ. सुलभा खोडके यांनी अधिवेशनात सांगितले की फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यात हवामानीय बदलामुळे तापजन्य सदृश्य आजाराचे रुग्ण वाढले व नंतर त्यांचा त्रास कमी झाला व ते बरे देखील झालेत .या कालावधीत चाचण्या वाढल्याने कोविड -१९ ची लक्षणे नसलेल्यांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाच्या आकड्यांमध्ये वाढ झाली. त्यामुळे जिल्हाप्रशासनाने गेल्या २0 फेब्रुवारीच्या रात्री ८ पासून तर २१ तारखेच्या सकाळी ८ वाजेपयर्ंत विकेंड लॉंक डाउन ची चाचपणी केली . मात्र अमरावतीत तडकाफडकी लॉकडाउन लागू झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले असून अमरावतीमधील ४0 टक्के जनता उपासमार सहन करत असल्याचे सांगून आ. सुलभाताई खोडके यांनी सभागृहाचे लक्ष वेधले .लॉकडाउन हा एक शेवटचा पर्याय असू शकतो उपाय नाही, लॉकडाउन लावून प्रश्न मिटणार नसून सामान्य जनता यात भरडली जात आहे . त्यामुळे आरोग्यसेवा वाढविणे गरजेचे असल्याचे आ. सुलभाताई खोडके यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करतांना सभागृहात सांगितले .
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024