यवतमाळ : शेतीचा फेरफार करण्याकरिता लाच मागणी करुन स्वीकारणार्या तलाठय़ाला गुन्हा सिध्द झाल्याने तीन वर्ष सक्त मजुरी व ५00 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. संजय आनंदराव निंभोरकर असे शिक्षा झालेल्या तलाठय़ाचे नाव आहे.
फिर्यादी ज्ञानेश्वर हजारे रा. शास्त्रीनगर उमरासरा यवतमाळ यांनी १0 सप्टेंबर २0१३ ला तलाठी संजय निंभोरकर यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. फिर्यादीचा शेताचा फेरफार करण्याकरिता व मंडळ अधिकारी यांना देण्याकरिता निंभोरकर यांनी एक हजार रुपयांची लाच मागणी केली. १७ सप्टेंबरला फिर्यादीकडुन एक हजार रुपये स्विकारतांना तलाठी निंभोरकरला रंगेहात पकडण्यात आले. तपास व चौकशी अंती प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. यात कलम ७ नुसार तीन वर्ष सक्त मजुरी ५00 रुपये दंड व कलम १३(१)(ड), १३(२) नुसार ३ वर्षे सक्तमजुरी व ५00 रुपये दंड ठोठावण्यात आला. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे अँड. मंगेश गंगलवार, व पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपअधीक्षक राजेश मुळे तसेच सहाय्यक पैरवी अधिकारी उत्तम अत्राम यांनी काम पाहिले.
(Image Credit : MPC News)