नवी दिल्ली : भारताच्या औषध नियंत्रक महासंचालायाने रविवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकद्वारा निर्मिती कोरोना लसीस अत्यावश्यक आणि आणीबाणीच्या परिस्थितीत सीमित वापरासाठी मंजुरी दिली. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकद्वारा निर्मिती कोरोना लसीबाबत भारताच्या औषध नियंत्रक महासंचालयाने घेतलेल्या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला.
ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत सुरु असलेल्या अभियानास एक निर्णयक वळण लाभले आहे. भारताच्या औषध नियंत्रक महासंचालायाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोरोना लसीला परवानगी दिल्यामुळे आरोग्यपूर्ण आणि कोरोनामुक्त भारताचा मार्ग वेगाने प्रशस्त होणार आहे. भारताचे तसेच आपल्या मेहनती वैज्ञानिक आणि नवनिर्मितीकारांचे अभिनंदन.
अत्यावश्यक आणि आणीबाणीच्या परिस्थितीत वापरासाठी मंजूर केलेले ह्या दोन्ही लस स्वदेशी आहेत ही प्रत्तेक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी भारतीय वैज्ञानिकांची तळमळ यातून दिसून येते ज्याचा मूळ भाव काळजी आणि करुणा आहे. कठीण काळात कार्यरत डॉक्टर, आरोग्य सेवक, कर्मचारी, वैज्ञानिक, पोलिस, स्वच्छता कार्यकर्ते आणि सर्व कोरोना योध्यांचे अतिशय विपरीत परिस्थितीत त्यांनी अनेकांचे प्राण वाचविल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करतो.
Related Stories
December 2, 2023