- मी खोटं नाही सांगत
- लिहितोय खरंखुरं
- लबाडाच आवतन
- जेवल्यावरच खरं !!
- लाख देऊ माफ करू
- देऊ फुकटच सारं
- लालसेचा लॉलीपॉप
- ठेवतात हातावर !!
- लबाडाच आवतन
- जेवल्यावरच खरं !!
- पाणी नळ विजेसह
- म्हणे देऊ आम्ही घर
- अजून राहातो आम्ही
- झोपडी,फुटपाथवर !!
- लबाडाच आवतन
- जेवल्यावरच खरं !!
- खोटं बोला रेटून बोला
- बोलतात सारे खरं
- जनतेस लुटुनिया
- भरती आपले घरं !!
- लबाडाच आवतन
- जेवल्यावरच खरं !!
- म्हणे गरिबी हटवू
- देऊ सर्वा रोजगार
- कमी करू महागाई
- करू रामराज्य सारं !!
- लबाडाच आवतन
- जेवल्यावरच खरं !!
- आश्वासनाची खैरात
- लावती बाभळीले बोरं
- वांझोटिले म्हणतात
- बाई होतील तुले पोरं !!
- लबाडाच आवतन
- जेवल्यावरच खरं !!
- ओठी काही पोटी काही
- यांच सारं काही न्यार
- गोड बोलून करती
- तुमच्या पाठीत वार !!
- लबाडाच आवतन
- जेवल्यावरच खरं !!
- नोका ठेऊ हो भरोसा
- तुम्ही यांच्या बोलण्यावर
- एकमेकांचे मावसभाऊ
- सारेच आहेत चोर !!
- लबाडाच आवतन
- जेवल्यावरच खरं !!
- म्हणून म्हणतो बाबू
- नको राहू गाफील बरं
- नको विकू तू स्वताले
- पैसा,हड्डी,पावटीवर !!
- लबाडाच आवतन
- जेवल्यावरच खरं !!
- -वासुदेव महादेवराव खोपडे
- सहा पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त)
- अकोला 9923488556
- (Images Credit : Prabhasakshi)