- रंग सावळा सावळा
- मन परंतु निर्मळ ।
- जननीच्या संस्काराने
- नष्ट झाली मरगळ ।।
- भारतीय बंधू सारे
- मजसाठी प्रिय फार ।
- जाती धर्मांच्या बेडीला
- नाही करत स्वीकार ।।
- मान्य नाही मज नारी
- आहे अबला म्हणून ।
- चालविते सृष्टी तीच
- जीव जन्माला घालून ।।
- मज पामरास काय
- सांगा कळणार ज्ञान ।
- फक्त जाणतो साऱ्यांना
- नित्य आपल्या समान ।।
- रंगभेद,धर्मभेद
- प्रांतवाद,भाषावाद ।
- याचमुळे देश माझा
- होणे आहे बरबाद ।।
- किती महंत जन्मले
- किती जन्मणार पुन्हा ।
- तरी आपल्या हाताने
- रोज घडणार गुन्हा ।।
- जरा आठवा वीरांना
- त्यांचे कार्य किती थोर ।
- त्यांनी कुठे आणीयले
- जाती धर्मांना समोर? ।।
- एक होऊ त्यांच्यासम
- लढा देऊ अन्यायाला ।
- प्रेम करणे शिकवू
- सारे मिळून जगाला ।।
- शब्दसखा
- -अजय रमेश चव्हाण,
- तरनोळी,ता.दारव्हा,जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७
(Image Credit : Bookganga)