* श्री मनीष महादेव चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य
* संस्थेला ऑक्सिजन काँसंनट्रेटर ची भेट
वणी : 31जुलै रोजी *’रॉयल फाऊंडेशन’* या सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक संस्थेच्या कार्यालयीन फलकाचे उदघाटन वणी शहरातील प्रसिध्द उद्योगपती, डेवलपर्स, बिल्डर- कॉन्ट्रॅक्टर श्री. मनीष महादेव चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी श्री. मनीष महादेव चौधरी यांनी रॉयल फाऊंडेशन संस्थेला रुपए 65,000/- किंमतीचे ऑक्सिजन काँसंनट्रेटर भेट दिले आणि संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व संस्थेकडून अधिकाधिक समाजोपयोगी कार्य होतील अशी अपेक्षा या प्रसंगी त्यानी व्यक्त केली.
या प्रसंगी अँड. नीलेश महादेव चौधरी आणि डॉ. रोहित सुधाकर वनकर यांनी सांगितले की समजाप्रती असलेल्या सामाजिक दायीत्व भावनेतून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याकरिता *’रॉयल फाऊंडेशन’* ही संस्था सुरू करण्यात येत असून सदर संस्थेच्या लोगो चे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे आणि लवकरच संस्थेची वणी, पांढरकवडा आणि राळेगाव शहराची कार्यकारिणी घोषित करण्यात येणार आहे आणि संस्थेच्या कामाला सुरवात होत आहे. या करिता सामान्य जनतेची साथ आणि आशिर्वाद गरजेचा आहे आणि तो संस्थेला मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे या वेळी सौ. वर्षा राजेश कचवे, अँड. नीलेश महादेव चौधरी, डॉ. रोहित सुधाकर वनकर. श्री. निकुंज अशोक अटारा, श्री. सागर वंजारी, श्री. अजय टोंगे, श्री. ललित राजेश कचवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.