वर्धा : वर्धा येथील रेल्वेस्थानकामधून जात असलेल्या धावत्या रेल्वे गाडीमधून उतरण्याचा प्रयत्न करणार्या वर्धा दयालनगर येथील ४0 वर्षीय महिलेचा सील चेकिंग सेवेवर असलेल्या आरक्षकाने जीवाची पर्वा न करता महिलेचे प्राण वाचविले.
पोलिस रेल्वे आरक्षक निलेश पिंजरकर यांना वंदनीय राष्ट्रसंत युवक-युवती विचारमंच वर्धा जिल्हातर्फे गौरविण्यात आले आहे.
दि. २१ मार्च रोजी घडलेल्या याघटनेची विचारमंचचे विकास बोरवार यांनी माहिती घेऊन वर्धा रेल्वे स्टेशन निरीक्षक व्ही.के. त्रिपाठी, उपनिरीक्षक विनोद मोरे, जिल्हाध्यक्ष चेतन परळीकर, सचिव सुरेंद्र बेलूरकर, राजू नवघरे, आशिष हलके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निलेश पिंजरकर यांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
वर्धा रेल्वेस्थानक येथे कार्यरत निलेश पिंजरकर यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वंदनीय राष्ट्रसंत युवक-युवती विचारमंच महाराष्ट्र राज्य प्रमुख अमर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हा तर्फे कर्तव्यतत्पर पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात आले आहे.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024