- आली आली दिवाळी
- सफाई झाली घराची
- स्वच्छ धुवून काढुया
- घाण काढुया मनाची
- दिवाळीच्या सणाला
- पताका लावून हार
- चांगले चांगले विचार
- एकमेकांना देवू चार
- फुले आणि फुल माळा
- सजवुया सारे सारे घर
- एकमेकांच्या मनाला
- आम्ही पडू न द्यावी चर
- जिकडे तिकडे आनंद
- असावा जीवनी मोद
- उचलून घेवुया काटे
- नष्ट करुया अवरोध
- दिप प्रज्वलन करून
- उघडुया उजेडाचे दार
- अविश्वास शंकाकुशंका
- द्वेष मत्सर करुया पार
- सहविचार सम भावाचे
- साबण उटणे अन् गंध
- चला पसरवूया बंधुंनो
- जीवनात खूप सुगंध
- तुम्हा आम्हा सर्वांची
- दिपावली सुखात जावो
- सुख समृद्धी आनंदाची
- घराघरात रेलचेल होवो
- -पी के पवार
- सोनाळा बुलढाणा
- ९४२१४९०७३१