अमरावती : कौशल्य विकास व उदयोजकता विकास मंत्रालय, केंद्रीय प्रशिक्षण संचालनालय, अंतर्गत कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलिटेक्निक योजना ही शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे राबविण्यात येते. या अनुषंगाने स्वयंरोजगारासाठी उपयुक्त तांत्रिक कौशल्यावर आधारित सहा महिने कालावधीचे रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन या संस्थेमार्फत करण्यात येत आहे.
प्रशिक्षणाचे आयोजन शासनाने दिलेल्या कोविडच्या नियमानुसार करण्यात येत आहे. हे प्रशिक्षण ग्रामिण व शहरी अल्प शिक्षित युवक व युवतींसाठी असून प्रशिक्षणासाठी वयाची अट नाही. मुलाखत पध्दतीने प्रशिक्षणार्थ्याची निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलिटेक्निक योजना कार्यालय, मुलींच्या वसतीगृहासमोर, शासकीय तंत्रनिकेतन परीसर, गाडगेनगर, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. यांनी केले आहे.