मुंबई : देशभरात कोरोची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, असे असले तरी राज्यात लसीकरणावर अधिक जोर दिला जात असल्याचा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. मुंबई, पुणे व नागपूर या शहरांची स्थिती चिंताजनक असून रुग्णसंख्या वाढली तर लॉकडाऊन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सरकारी पातळीवर कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी गुजरात व बंगालमधील व्यवस्थेवर टीका केली. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी आहे, तर गुजरातमध्ये आयपीएलचे सामने सुरू आहेत. दुसरीकडे ते म्हणाले की, राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठा प्रमाणात वाढली तर राज्यावर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध राहत जबाबदारीने वागण्याची गरज आहे.
रुग्णसंख्या ज्या वेगाने वाढतेय त्या वेगाने तयारी करावी लागेल, राज्यात जम्बो सेंटर अँक्टीव्हेट करणे गरजेचे असून जिथे जिथे स्टाफ डॉक्टर्सची कमतरता असेल तेथे ते भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काळात रुग्णसंख्या पूर्ण रोडावली होती त्यामुळे ऑनबोर्ड घेतलेले डॉक्टर रिलिव्ह केले होते, असे ते म्हणाले.
आरोग्यमंत्री म्हणाले ४५ लाख जणांचे लसीकरण करून झाले आहे. २४00 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणि मेडिकल कॉलेजांमध्ये लसीकरण सुरू आहे. खासगी रुग्णालयांमध्ये ६00 ठिकाणी लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. लशीचा साठा पडून असल्याची चुकीची माहिती सांगितली जात असल्याचे ते म्हणाले. राज्यात रोज तीन लाख लशी देण्यात येत असून लसीकरण आक्रमकपणे करण्यात येणार आहे. ७३ टक्के चाचण्या आर टी पी सी आर टेस्ट करत आहोत. बंगालमध्ये निवडणुका तिथे तर कुठलेच नियम पाळले जात नाही.
Contents
hide
Related Stories
December 3, 2024