मुंबई : रिताभरी चक्रवर्ती ही बंगाली सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बावल, कोलकटाय कोलंबस, परी, चित्रकारी जीवन यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेली ही अभिनेत्री गेली दोन वर्ष सिनेसृष्टीपासून दूर आहे. लक्षवेधी बाब म्हणजे गेल्या काही काळात तिला अनेक बिग बजेट प्रोजेक्टसाठी विचारण्यात आलं परंतु तिने नकार दिला. नुकतेच एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रिताभरीनं चित्रपट नाकारण्याचं कारण सांगितलं. भारतीय फिल्म इंडस्ट्रीला प्रयोगशील म्हटलं जातं पण खरं पाहाता आपण आजही चौकटीत राहूनच चित्रपटांची निर्मिती करतोय. अशी तक्रार तिनं केली. ती म्हणाली, करिअरच्या सुरुवातीस मी मिळतील त्या भूमिका साकारल्या. त्यापैकी जवळपास सर्वच भूमिका एकसारख्याच होत्या. केवळ त्यांची नावं वेगवेगळी होती. परंतु आता मी पठडीबाज अन नायकाच्या मागे केवळ उभं राहणार्या भूमिका नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. माज्या अभिनय शैलीला आव्हान देणारी भूमिका मी शोधतोय. त्यामुळे फिल्मी दुनियेपासून सध्या मी दूर आहे. रिताभरीनं २0१२ साली तोबो बसंता या चित्रपटातून फिल्मी दुनियेत पदार्पण केलं होतं. त्यानंतर छोटू शकोण, बावल, ओनियो आपला, बारूद यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.
वन्स अपॉन अ टाइम इन कोलकाता या क्राईम थ्रिलर चित्रपटामुळे ती खर्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती.
Related Stories
December 2, 2023