दारव्हा : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव शेळके यांचे 0३ जानेवारीला रात्रीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच जिल्ह्यातील सर्वच पक्षातील राजकीय क्षेत्रात दु:ख व्यक्त होत आहे. उत्तमराव शेळके यांचे राष्ट्रवादी पक्षा व्यतीरीक्त इतर पक्षातही पदाधिकार्यांशी चांगले संबंध होते. दारव्हा तालूक्यात व जिल्ह्यात शेतकरी शेतमजूरांचे प्रश्न पोट तिडकीने मांडणारा नेता हरपला अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. आज सोमवारला सायंकाळी त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Related Stories
December 7, 2023