- पिंपळखुटा/स्वाती इंगळे,
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने *भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमा अंतर्गत* दिनांक २० मार्च २०२१ ते २३ मार्च २०२१ या कालावधीत तीन दिवशीय चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे. विविध विषयावरिल या आभासी ऑनलाइन (झूम मिटिंग) चर्चासत्राच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी
श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष मुरे तर राष्ट्रीय सेवा योजना,संत गाडगे अमरावती विद्यापीठ अमरावती चे संचालक डॉ राजेश बुरंगे यांचे हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.प्रमुख पाहुणे म्हणून श्री संत शंकर महाराज विद्या मंदिर व कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद आंबटकर,विज्ञान अध्यापक मंडळ धामणगाव रेल्वेचे तालुका अध्यक्ष अनंत डुमरे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन कार्यक्रम अधिकारी डॉ.नरेश इंगळे यांनी केले.ऑनलाइन तांत्रिक जबाबदारी सुश्मित मुरे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
दि.२० मार्च रोजी प्रथम सत्रात “विदर्भातील स्वातंत्र्य चळवळ” या विषयावर जिजामाता महाविद्यालय बुलढाणाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ.नामदेव ढाले,भारतीय महाविद्यालय मोर्शीचे इतिहास विभाग प्रमुख डॉ.संदिप राऊत यांनी मार्गदर्शन केले.द्वितीय चर्चासत्रात “स्वातंत्र्य चळवळीत सयाजीराव गायकवाड यांचे योगदान”या विषयावर यशवंत भाऊ पाटील महाविद्यालय भोसे (क) ता.पंढरपूर जिल्हा सोलापूरचे प्राचार्य डॉ संजय मुजमुले यांनी तर स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्संत तुकडोजी महाराज यांचे योगदान या विषयावर छत्रपती महाविद्यालय आसेगाव पूर्णा ता.अचलपूरचे इतिहास विभाग प्रमुख डॉ.प्रवीण सदार यांनी मार्गदर्शन केले.
तृतीय सत्रात “भारतीय संविधानाची जडणघडण”या विषयावर भारतीय महाविद्यालय मोर्शी राज्यशास्त्र विभागाचे प्रा.घनश्याम दाणे,छग्नराव भुजबळ महाविद्यालय हिवरा आश्रम जि बुलढाणाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.संजय जाधव यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
तीन दिवसीय ऑनलाइन चर्चासत्राचा समारोपीय कार्यक्रम दि २३ मार्च २०२१ रोजी प्राचार्य डॉ.सुभाष एस.मुरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून मूलजीभाई कढी महाविद्यालय अचलपूर कॅम्पचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख तथा रासेयोचे माजी जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. राजेश चव्हाण, आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वेचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख तथा रा.से.यो.चे माजी क्षेत्रिय समन्वयक डॉ दिपक शृंगारे प्रामुख्याने उपस्थित होते.या वेळी शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू शहीद सुखदेव या भारत मातेच्या वीर सुपुत्राना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मान्यवरानी स्वातंत्र्य चळवळीचा आढावा घेत विद्यमान स्थितीत रासेयो स्वयंसेक-स्वयंसेविका यांची जबाबदारी या अनुषंगाने सविस्तर असे मार्गदर्शन केले.संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नरेश इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन लिपिक लक्ष्मण कांबळे यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ऑनलाइन चर्चासत्र कार्यक्रमाला प्रा.विजय कामडी,प्रा. सुषमा थोटे,डॉ.मेघा सावरकर,संतोषचंद्र नागपुरे, अमित मेश्राम,ओमप्रकाश इंगोले यांचे सह मान्यवर मंडळी, महाविद्यालयीन प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी ,स्वयंसेवक,स्वयंसेविका सर्व विद्यार्थी आणि स्वयंसेवा प्रेमी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.