अमरावती : जिल्हा व सत्र न्यायालयातर्फे राष्ट्रीय लोकअदालतीत 675 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
या लोकअदालतीत वाहन अपघात नुकसानभरपाई, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँकांची प्रलंबित प्रकरणे, चेक न वटल्याची प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, विवादसंबंधी कायद्याचे दावे, बँकेचे, तसेच दिवाणी आणि फौजदारी अपील व इतर दिवाणी प्रकरणे आदी संबंधित दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीसमोर ठेवण्यात आली होती.
लोकअदालतीतील प्रकरणांची पूर्तता करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात 29 मंडळांची निर्मिती करण्यात आली. त्यात न्यायाधीश, अधिवक्ता, तसेच न्यायालयीन कर्मचा-यांचा समावेश होता. लोकअदालतीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातून 3 हजार 706 दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 675 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
लोकअदालतीच्या माध्यमातून एकूण पाच कोटी 33 लाख 83 हजार 360 रूपये रकमेच्या प्रकरणांचा न्यायनिवाडा झाला. पती व पत्नी असे वादी-प्रतिवादी असलेल्या चार प्रकरणांवरही या लोकअदालतीतून सामंजस्यपूर्वक तोडगा काढण्यात आला.
जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष उर्मिला एस. जोशी-फलके व सचिव ए. जी. संताणी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत यशस्वीरीत्या पार पडली.
000