नवी दिल्ली : राष्ट्राच्या प्रगतीमध्ये एमएसएमई क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांच्या हस्ते अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुस-या टप्प्याचे आणि सूरत मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. दूरदृश्य प्रणालीव्दारे झालेल्या या कार्यक्रमाला गुजरातचे राज्यपाल, केंद्रीय गृह मंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री उपस्थित होते.
अहमदाबाद आणि सूरत शहरांना मेट्रोची भेट मिळत असल्याबद्दल लोकांचे अभिनंदन केले. व्यावसायिक दृष्टीने दोन्ही शहरे महत्वाची असल्यामुळे तिथली संपर्क व्यवस्था मेट्रो सुविधेमुळे अधिक कार्यक्षम बनण्यास मदत होणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अहमदाबाद ते केवडिया या मार्गावर आधुनिक जनशताब्दीच्या सुविधेसह आणखीही नवीन गाड्यांची सोय झाल्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातच्या जनतेचे अभिनंदन केले. १७ हजार कोटींच्या प्रकल्पांची कामे सुरू करण्यात आली आहेत, यावरूनच कोरोना कालावधीतही पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामांनी चांगलाच वेग पकडला आहे, हे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात हजारों कोटींचे प्रकल्प देशाला सर्मपित करण्यात आले तसेच नवीन प्रकल्पांचेही काम सुरू झाले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
अहमदाबाद आणि सूरत ही दोन्ही शहरे आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये सर्वात जास्त योगदान देणारी शहरे आहेत, असे सांगून पंतप्रधानांनी अहमदाबादमध्ये पहिल्यांदा ज्यावेळी मेट्रो सुरू झाली, त्यावेळी सर्वजण किती उत्साही होते, प्रत्येकाने आपली स्वप्ने त्या मेट्रो प्रकल्पाबरोबर कशी जोडली होती, याची आठवण सांगितली. मेट्रोच्या दुस-या टप्प्याचा अहमदाबादच्या जनतेला अधिकच लाभ होणार आहे, कारण यामुळे नवीन विस्तारलेल्या शहरातल्या लोकांसाठी वाहतुकीचे सोईचे साधन मिळणार आहे. उत्तम संपर्क यंत्रणेमुळे लाभ घेता येणार आहे. याचप्रमाणे सूरतमध्येही चांगली संपर्क व्यवस्था विकसित होऊ शकणार आहे.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024
September 5, 2024