मुंबई : तुज्यात जीव रंगला मालिकेतील राणा दा आणि पाठकबाई हे पात्र महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले. गेली चार वर्षे आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षक वर्गाचे त्यांनी मनोरंजन केले. आता ही मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. राणा दा आणि पाठकबाईंच्या अभिनयाला तर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद आणि प्रेम दिले. रांगड्या मातीतील साध्या भोळ्या माणसांचे आयुष्य प्रत्येक वळणावर कसे बदलते, हे या मालिकेच्या माध्यमातून दाखवण्यात आलेय.
सुरज आणि नंदिनी वहिनी साहेब यांच्याही भूमिका तितक्याच महत्त्वाच्या ठरल्या आहेत. या मालिकेतील या अंजली उर्फ अक्षया देवधर आणि अभिनेता अमोल नाईकने याबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. अक्षयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आणि अमोल नाईकने फेसबूकवरून दिली आहे.
काय म्हटलयं पोस्टमध्ये?
मालिकेच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होत आहे. गेली चार वर्ष आणि १२५0 हून अधिक भागांनंतर आता थांबायची वेळ जवळ आलीये. या मालिकेशी संबंधीत प्रत्येकालाच या मालिकेने खूप काही दिलंय! प्रत्येकासाठी ही मालिका स्पेशल आहे! आजपासून पुढचे सहा दिवस ह्या मालिकेच्या प्रवासातले काही क्षण शेअर करायचा प्रयत्न करेन! नक्की पहा, तुज्यात जीव रंगलाचा शेवटचा आठवडा!…
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023