- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर हे 22 व 23 ऑगस्टला अमरावती जिल्हा दौ-यावर आहेत.
दौ-यानुसार, त्यांचे 22 ऑगस्टला सकाळी 1.15 वा. आगमन होईल. दु. 1.30 वा. निवासी उपजिल्हाधिकारी व नगररचना सहायक संचालकांशी विद्यानिकेतन फार्मसी कॉलेजबाबत चर्चा, दु. 2 ते 4 अमरावती विभागातील सुनावण्या, दु. 4.30 वा. अंजनगाव सुर्जीकडे रवाना, सायं.6 वा. अंजनगाव येथे शासकीय विश्रामगृहात आगमन, सायं. 6 वा. अनुसूचित जाती जमाती व अल्पसंख्याक व्यक्तींच्या मेळाव्यास उपस्थिती. राखीव व मुक्काम. दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. अनुसूचित जाती, जमातीच्या व्यक्तींची निवेदने स्वीकारणार व अधिका-यांसमवेत चर्चा, दु. 12 वा. अंजनगाववरून नागपूरकडे प्रयाण.