धामणगाव रेल्वे : पोलिसांप्रमाणे होमगार्ड देखील त्याचप्रकारची जबाबदारी पार पाडतात. त्यामुळे पोलिसांप्रमाणे त्यांना वेतन मिळायला हवे, गत भाजप- शिवसेना युती शासनाच्या काळात त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला. मात्र या महाविकास आघाडी सरकारच्या काळात या होमगार्ड वर अन्याय सुरू झाला त्यांना न्याय कधी देता असा प्रश्न धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी विधानसभा अधिवेशनात निर्माण केला. राज्यातील ४४ हजार होमगार्ड चा प्रश्न मांडणारे हे पहिले आमदार ठरले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम तसेच सण-उत्सव, वाहतुकीचे नियम, रुग्णालयाची सुरक्षा, शासकीय वस्तीगृह कारागृहाची सुरक्षा असे विविध कामे पोलीस प्रशासनाच्या यांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड करीत आहे. राज्याच्या पोलिस दलात प्रमाणेच होमगार्ड यांचे कायदा-सुव्यवस्था राखण्यात मोठे योगदान आहे. मात्र आघाडी सरकारच्या काळात या होमगार्ड बांधवांना मोठ्याप्रमाणात अन्याय होत आहे. कोरोना काळात त्यांना कोणतीही सुविधा मिळाली नाही तसेच वेतनाचा प्रश्न त्यांचा सुटला नाही त्यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ मिळाली नाही या गंभीर प्रश्नाकडे राज्य सरकार कधी लक्ष देणार असा थेट प्रश्न धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारला.आघाडी सरकार मध्ये शिवसेना ही सत्तेत आहे त्यामुळे किमान होमगार्डना तरी न्याय द्यावा अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो असे मत आ. प्रताप अडसड यांनी अधिवेशनात प्रखरपणे मांडून होमगार्डचा प्रश्न पुढे रेटला दरम्यान. होमगार्ड यांना त्वरित न्याय देण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आमदार प्रताप अडसड यांना दिले.
(Image Credit : Sakal)