मुंबई : राज्यभरातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीला सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून दिली. ५0 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरू होणार आहेत. तसेच, या वर्षी विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक नसणार आहे. ही महाविद्यालयं सुरू होत असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देखील काही गाइडलाईन्स विद्यापीठांना दिलेल्या आहेत. प्रत्येक महाविद्यालयास करोना नियमावलीचे पालन बंधनकारक असणार आहे.
यावेळी उदय सामंत म्हणाले, महाविद्यालयं सुरू करत असताना एक महत्वाची भूमिका विद्यापीठांची किंवा खासगी विद्यापीठांची असायला हवी. यूजीसीने सांगितल्याप्रमाणे वर्ग खोल्यांमध्ये बसण्याच्या व्यवस्थेच्या ५0 टक्के रोटेशन पद्धतीने विद्यार्थ्यांची संख्या घेऊन महाविद्यालये सुरू करण्यास राज्य सरकारने आज परवानगी दिली आहे. याचा अर्थ ५0 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरू होतील. महाविद्यालये सुरू होत असताना यूजीसीने देखील काही गाइडलाईन्स विद्यापीठांना दिलेल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे, संबंधित जिल्हाधिकारी संबंधित यंत्रणांना पायाभूत सुविधांची संपूर्ण माहिती दिली गेली पाहिजे. करोना संसर्गाच्या प्रमाणाचा आढावा जिल्हाधिकार्यांनी ठरवलं पाहिजे व त्यानंतर विद्यापीठांनी आपली महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. ही विद्यापीठं महाविद्यालयं १५ फेब्रवारीपासून सुरू करू शकतात, अशा पद्धतीचा निर्णय आज घेण्यता आला आहे.
Related Stories
October 10, 2024