मुंबई : अद्यापही राज्यातील अडीच हजारहून अधिक दुर्गम भागातील गावाखेड्यांमध्ये इंटरनेट पोहचलेले नाही याकडे लक्ष वेधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारत नेट मोहिमेच्या माध्यमातून इंटरनेटचे जाळे पसरवण्याचे काम सुरु असल्याचे ते म्हणाले. या कामासंदर्भात केंद्राने लक्ष घालून राज्याला लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी राज्य शासन काम करत असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील या प्रकल्पांसाठी केंद्राने प्राधान्याने मदत करावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये केली.
राज्यातील सर्वच गावांमधील नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगवान सेवांचा आधिक चांगला लाभ मिळावा यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य शासनाची भूमिका कल करे सो आज कर, आज करे सो अभी अशी असल्याचे सांगताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राने कशाप्रकारे वाटचाल केली याबद्दल सांगितले. या बैठकीमध्ये कोरोना काळामध्ये तसेच करोना कालावधीमध्येही राज्याचा विकास थांबला नाही. राज्यावरील करोना संकटावर मात काढत आम्ही मार्ग काढण्यासाठी लढत होतो असे उद्धव म्हणाले. आम्ही कोरोनाचे संकटाकडे संधी म्हणून पाहत वाटचाल करत असल्याचेही उद्धव यांनी म्हटले. आम्ही आपत्तीला संधीत बदलत वाटचाल करत आहोत. गेल्या वर्षभराच्या कालावधीत आम्ही तंत्रज्ञानावर खूप भर दिला असून इंटरनेटची सेवा राज्यातील सर्व गावांमध्ये पोहचवण्याचे आमचा उद्देश असल्याचे उद्धव ठाकरे यांनी नीती आयोगाच्या बैठकीमध्ये सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की, केंद्र सरकारने कार्यालयीन वेळासंदभार्तील पारंपरिक पद्धतीऐवजी नवीन धोरण अंमलात आणण्यासंदभार्तील विचार करावा. नीती आयोगाच्या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीमध्ये करोना, लॉकडाउनबरोबरच देशभरातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. यावेळेस आपली भूमिका स्पष्ट करताना उद्धव ठाकरेंनी, करोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नसल्याचे सांगितले.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024