दररोज वर्तमानपत्र उघडलं तर एक ना एक बातमी वर्तमानपत्रात झळकलेली दिसते. ती म्हणजे अमुक अमुक ठिकाणी अपघात झालाय. ते वाचलं की अंगावर काटा उभा राहतो. अपघात कुणाचाही होवो, थोडीफार भीती वाटणारच.
आज लोकसंख्या एवढी वाढली आहे की त्या लोकसंख्येवर आळा घालता येणे सहज शक्य नाही. अशातच ही वाढती लोकसंख्या आपले सुख मिळविण्याचे साधनं शोधत असते. त्यातच असे साधनं शोधत असतांना ते कुठेही जायला यायला साधनं विकत घेत असतात.
हाच हेतू अंगीकारुन लोकांनी प्रवासासाठी स्वतःची साधनं विकत घेतली. त्यातच कंपन्यांनी गाड्या या किस्तवार देणं सुरु केल्यानं प्रत्येकांच्या घरी गाड्या पोहोचल्या. त्यातच थोडेसे गाड्या शिकलेले तरुण तरुणी अगदी अल्पवयात रस्त्यावरुन गाड्या चालवितात. तेही भरधाव. ते मायबापांना ऐकतच नाही. मायबापही त्यांना बिनधास्त गाड्या देत असतात. त्यांना आपली पाल्ये गाडी कशी चालवितात हे माहित नसतं. त्यातच ते गाडी चालवितांना एका बाजूनं न चालवता अगदी मध्यभागातून गाड्या चालवित असतात. त्यातच त्याच मध्यभागातून जड वाहनेही भरधाव चालत असतात. त्या जड गाड्यावर असलेले चालक हे अगदी झोप लागू नये वा थकवा वाटू नये, म्हणून नशा करुन गाड्या चालवित असतात. त्यातच अशा तरुणाईच्या आड्या तेढ्या गाड्या चालविताच त्या जड वाहन चालवित असलेल्या चालकांचे नियंत्रण सुटते व अपघात घडतो.
मुख्यतः अपघात घडतांना जर दोघे बसले असतील आणि ते आपापसात बोलत असतील तर हमखास होतो. कारण बोलतांना मेंदूची तीन भागात विभागणी होत असते. एक म्हणजे समोर पाहणे दुसरं म्हणजे कानानं आवाज ऐकणे व तीन म्हणजे गोष्टी करणे. त्यातच गोष्टी करता करता आपला ताळमेळ सुटतो व अपघात घडतो.
साधारणतः आपला मेंदू हा एकाचवेळी तीन विचार करु शकतो किंवा तीन कार्य करु शकतो. पण त्याला चवथं कार्य जमत नाही. त्यातच हे वाहनस्वार गाडी चालवितांना स्वतःला महाहुशार समजून खर्रयाचे तोबारेही तोंडात भरुन चालत असतात. त्यातच गोष्टी करता करता त्यांचं ते चघळणंही सुरुच असते. त्यातच थुंकणंही. त्याच चवथ्या कार्याची सुसूत्रता जुळली न गेल्यानं अपघात होतो.
काही काही लोकांचा अपघात तर मोबाइल वापरल्यानंही होत असतो. ते मोबाईल कानाला लावून बोलत असतात. एक लक्ष समोर पाहण्यात असते. दुसरं आजूबाजूंच्या गाड्यांचे आवाज ऐकण्यात तिसरं लक्ष मोबाईलचा आवाज ऐकण्यात व चवथं लक्ष ते ऐकून बोलण्यात. अशावेळी ताळमेळ बिघडतो व अपघात होतो.
तरुण वयातील मुलांच तर बोलूच नये. त्यातच तरुण मुलीही. त्या तर आपल्याला काहीच होवू शकत नाही वा आपण महिला असल्याने आपला गुन्हा जरी असला तरी आपल्याला कोणीच काही म्हणू शकणार नाही असा विचार करुन त्या बिनधास्त गाड्या चालवित असतात. त्यातच एखाद्या वेळी गाडी टकरावतेच. त्यातच त्या तरुणींचा गुन्हा असला तरी लोकं सहानुभूती वजा पुरुषांनाच खोटे ठरवितात. यातच त्या तरुणींची महत्वाकांक्षा वाढते व त्या त्यानंतरही आपल्या चालविण्यात सुधार न करता पुन्हा अगदी तशाच पद्धतीनं गाड्या चालवित असतात. त्याची परियंती पुढे त्यांचा मोठ्या स्वरुपात अपघात होण्यामध्ये होते. त्यांचा असा विचार करुन अगदी सुसाट वेगाने कट मारुन गाड्या चालवणे हे त्यांचे त्यांच्याच जीवावर बेतते. दुस-याच्या नाही हे तेवढंच सत्य आहे.
अपघात होतच असतात. आपली चूक असो वा नसो, त्यासाठी आपण पुरेशी आपलीच सुरक्षा करुन घ्यायला हवी. त्यासाठी पुरेसं डोक्याला मार लागू नये म्हणून मेंदू सुरक्षा कवच वापरायला हवं. तेही चांगल्या प्रतीचं. परंतू आपण ते न वापरता अगदी आडवळणानं जातो. पोलिसांची चैलन करण्याची आपल्याला भीती वाटते. पोलिसांनी पकडू नये म्हणून आडवळण. परंतू अपघात आडवळणावर होणार नाही कशावरुन. तो काय सांगून येतो काय, मी अमुक ठिकाणी होणार नाही. तू याच रस्त्यानं जा. अशातच आपण आडवळणानं जाताच आपल्याला अपघात होतो. चूक कधीकधी आपलीच असते.
रस्ते अपघातात कधीकधी चूका आपल्याच असतात. पण आपण कधीच आपली चूक मानत नाही. त्यातच आपला अहंकार वाढतो. तो अहंकार एवढा वाढतो की त्यानंतर आपण कशी गाडी चालवतो, ते आपल्यालाही कळत नाही. कारण रस्त्यावरुन गाड्या चालवितांना आपण स्वतःला शेरच समजत असतो. मग अपघात होणार नाही तर काय? तसंही पाहता लोकसंख्या वाढलीच आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या काळात रस्त्यावरुन अगदी मुंग्यांची रांग चालल्यागत वाहने धावत असतात.
रस्ते अपघातात अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपलं कर्म. आपले जर कर्म वाईट असेल किंवा आपण कोणाचे मन जर दुखावलेले असेल तर तो व्यक्ती आपल्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरुपात शिव्या शाप देतच असतो. कधी तोंडातून बोलून दाखवतो, ‘ जा कुत्र्याच्या मौतीनं मरशील.’ ‘जा जेव्हा मरशील तेव्हा तोंडात पाणीही पडणार नाही. तेव्हाच असं अपघाताचं मरण येतं. त्यावेळी जर कोणी अचानक गेलेलं असेल तर तोंडात पाणीही पडत नाही. तसेच कोणी म्हणतात की ‘मरशील तर तुझा चेहराही लोकांना दिसणार नाही. अगदी तसंच घडतं. कधी कधी चेहराही दिसत नाही.
कधी कधी आपलाच गुन्हा असतो. पण तो आपण प्रत्यक्षात न स्विकारता दुस-याला दोष देवून म्हणतो की ‘ जा कुत्र्याच्या मौतीनं मरशील’ किंवा कोणता शाप देतो. परंतू यामध्ये ज्यांचा गुन्हाच नसतो, त्याला ती शापवाणी लागत नाही. ती शापवाणी आपल्यालाच लागते. त्यांचे परीणाम आपल्यालाच भोगावे लागतात. म्हणून कोणाबद्दल काहीही अपशब्द बोलू नये. तसेच कुणाला शापही देवू नये. तुम्ही शाप देणारे कोण? कोणीच नाही. तेव्हा असा शाप कोणीही कोणाला देवू नये. जेणेकरुन तो शाप अापल्यालाच लागेल व आपलेच नुकसान होईल. रस्ते अपघातही आपल्याच ब-यावाईट कर्मानुसार घडत असतात. आपले कर्म जर चांगले असतील तर आपला रस्ता अपघात होणारच नाही. मरण तर केव्हा ना केव्हा येणारच आहे. मरणानं कोणाला सोडलेलं नाही. तेव्हा आपण आपले कर्म चांगले ठेवावे. जेणेकरुन त्यानुसार चांगले मरण येईल. आजुबाजूला आपले चार नातेवाईक बसलेले असतील. ते आपल्या मरणावर शोक व्यक्त करीत असतील. कोणी पाणी पाजतील, कोणी गुलाबजल. त्यावेळी खरंच आपल्याला वाटेल की आपण पुण्यवान होतो की आपल्याला असं मरण मिळत आहे. तेव्हा मरतांनाही आपलं ह्रृदय सदगद होईल. हे तेवढंच सत्य आहे. आपल्याला मरण असं रस्ते अपघातातून व्हायला नको. प्रत्येकानं गाड्या घ्या. ती आपली गरज आहे. परंतू गाड्या घेतल्यानंतर सावकाश व हळू चालवा. हेल्मेट वापरा. तसेच मोबाईलवर बोलत वा कोणाशी गोष्टी सांगत गाड्या चालवू नये. कारण गोष्टी नंतरही सांगता येईल किंवा गोष्टी करायच्याच आहेत तर थोडंसं थांबून कराव्यात. जर वाचलो तर आणखी गोष्टी करता येईल किंवा अर्जंट फोन आल्यास थोडंसं थांबून बोलावं. वाचलो तर बरंच बोलता येईल. तसेच आपले कर्मही चांगले ठेवण्याचा प्रयत्न करावा. विनाकारण कोणाचा जीव घेवू नये वा कोणाला विनाकारण त्रास देवू नये. साध्या मुंग्यामाकोड्यांनाही नाही. तसेच आपली सुरक्षा आपणच करावी. कारण रस्ते अपघात ही एक भीषण समस्या आहे. जी समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यावर अनुबंध लावता येईल.
– अंकुश शिंगाडे
नागपूर
९३७३३५९४५०