नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचा निकाल लागण्याआधीच भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू असणार्या रविंद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. ३२ वर्षीय जडेजाचे सर्वाधिक म्हणजेच ३८६ पॉइण्ट्स असून वेस्ट इंडीज संघाचा कणार्धार जेसन होल्डर आणि इंग्लंडचा बेन स्ट्रोक्स हे अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर आहेत.
मागील क्रमावारीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणार्या होल्डरचे २८ पॉइण्ट कमी झाले आहेत. त्यामुळेच जडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये ऑक्टोबर २0१८ नंतर पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर पोहचलाय. या आदीमध्ये आर. अश्विनचाही समावेश आहे. अश्विन या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. गोलंदाजांच्या यादीमध्ये अश्विन दुसर्या स्थानी आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा कसोटीमधील सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. त्याचबरोबर ऋषभ पंत आणि रोहित शर्मा या दोन भारतीय खेळाडूंचाही कसोटीमधील अव्वल १0 फंलदाजांमध्ये समावेश आहे. ७४७ अंकांसहीत पंत आणि रोहित शर्मा दोघेही संयुक्तरित्या या यादीत सहाव्या स्थानावर आहेत.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024