मधुमेह ही व्याधी नसून शारीरिक अवस्था असल्याचं आपण जाणून घेतलं. याबाबत आणखी माहिती घेऊ. टाईप वन आणि टाईप टू असे मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. टाईप वन प्रकारातला मधुमेह जन्मजात असतो. अनुवांशिक कारणांमुळे जन्मतच व्यक्तीच्या शरीरात इन्शुलिन तयार होत नाही. यावेळी रूग्णाला बाहेरून इन्शुलन देणं गरजेचं असतं. टाईप टू प्रकारातल्या मधुमेहात शरीरात इन्शुलन तयार होण्याच्या प्रक्रियेत बाधा येते. म्हणून याला नॉन इन्शुलिन डिपेंडंट मधुमेह म्हटलं जातं. साधारण पस्तीशीनंतर टाईप टू प्रकारातला मधुमेह होतो. टाईप टू मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित आहे. बैठं काम, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, आहाराच्या चुकीच्या पद्धती यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रत्येकानेच आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे. मधुमेहाला प्रतिबंध करण्यासाठी शारीरिक हालचाल महत्त्वाची असते. म्हणूनच दररोज अर्धा तास तरी व्यायाम केला पाहिजे. गोड, तेलकट अन्नाचं आहारातलं प्रमाण कमी करावं तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू ठेवावेत. योग्य व्यायाम आणि आहार-विहाराने गोळ्या न घेताही मधुमेह नियंत्रणात राहू शकतो.
Contents
hide
Related Stories
October 31, 2024
October 19, 2024
September 3, 2024