मुर्तिजापूर : नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली शाळेची द्वारे पुन्हा त्याच उत्साहाने उघडल्या गेली. निकाल ऑनलाईन असल्यामुळे दरवर्षी निकालाच्या दिवशी शाळेत जशी गर्दी असते तशी दिसली नाही, मात्र विद्यार्थ्यांपासून शिक्षक, पालकांपर्यंत आत्मविश्वास पूर्ण आनंदात तसूभरही कमतरता झाली नाही. या आनंदाच्या उत्सवात अस्मिता राऊत या विद्यार्थींनीने ५०० पैकी ४६२ गुण मिळवून मुर्तिजापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
मुर्तिजापूर येथील श्रीमती सरला राम काकानी एज्यूकेशन अकादमी मुर्तिजापूर येथिल अस्मिता नारायण राऊत ही विद्यार्थिनी आहे. तिला या यशाबद्दल जेंव्हा बोलते केले तेंव्हा शिकवणींच्या आभासाला अधोरेखित करित ज्या प्रांजळपणे शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांना तिने श्रेय दिले.कु.अस्मिता नारायण राऊत हिने एस.एस.सी परीक्षेत 92.40% गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले. कु.अस्मिता राऊत ही यानंतर तिचा डाॅक्टर होऊन रुग्नांची सेवा करण्याचा मानस व्यक्त केला आहे. मुर्तिजापूर शहरात व परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोबतच ती आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व आई वडील यांना देते.