यवतमाळ : गत २४ तासात जिल्ह्यात एका मृत्युसह २१५ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ५६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील ७१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या २१५ जणांमध्ये १२१ पुरुष आणि ९४ महिला आहेत. यात यवतमाळ येथील १00 रुग्ण, दारव्हा २८, पुसद २२, दिग्रस १७, पांढरकवडा १६, वणी १२, नेर १0, झरीजामणी ३, बाभुळगाव आणि उमरखेड प्रत्येकी 2, आर्णि, राळेगाव आणि इतर ठिकाणचा प्रत्येकी १ रुग्ण आहे.
बुधवारी एकूण १२७१ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी २१५ जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर १0५६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात १२९६ अँक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापयर्ंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १६७१६ झाली आहे. २४ तासात ५६ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १४९६९ आहे. तर जिल्ह्यात एकूण ४५१ मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापयर्ंत १५६७0१ नमुने पाठविले असून यापैकी १५५५७९ प्राप्त तर ११२२ अप्राप्त आहेत. तसेच १३८८६३ नागरिकांचे नमुने आतापयर्ंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024