यवतमाळ : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या शहरी व ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याकरीता प्रतिबंधीत क्षेत्र वगळता जिल्ह्यात 0८ मार्च २0२१ च्या मध्यरात्रीपयर्ंत लागू करण्यात येत असून सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना ह्या सकाळी ९ ते सायंकाळी ५ पयर्ंत सुरु राहतील.
सर्व प्रकारची शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आरोग्य व वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस एनआयसी, अन्न व नागरी पुरवठा, एफसीआय, एन.वाय.के. बँका सेवा वगळून) ह्या १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरु राहतील. सर्व प्रकारच्या खाजगी कार्यालयातील आस्थापना ह्या एकूण १५ टक्के किंवा कमीतकमी १५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरु राहतील.
ग्राहकांनी दुकानामध्ये खरेदी करण्याकरीता जवळपास असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांचा वापर करावा. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरु न ठेवता फक्त पार्सल सुविधेस परवानगी राहील. लग्न समारंभाकरीता 25 व्यक्तींना (वधू व वरासह) तहसिलदार/ मुख्याधिकारी यांचेकडून परवानगी अनु™ोय राहील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (महाविद्यालय, शाळा) येथील अशैक्षणीक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानीक यांना ई-माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे ई. कामाकरीता परवानगी अनु™ोय राहील. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करतांना चार चाकी गाडीमध्ये चालका व्यतिरिक्त इतर तीन प्रवासी अनु™ोय राहतील. तीन चाकी गाडी (उदा. अँटो) मध्ये चालका व्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेलमेट व मास्कसह दोन प्रवासी यांना परवानगी राहील. आंतरजिल्हा बसवाहतूक करतांना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ५0 टक्के प्रवासीसह वाहतूकीकरीता परवानगी अनु™ोय राहील. सर्व धार्मिकस्थळे ही एकावेळी १0 व्यक्तीपयर्ंत मयार्दीत स्वरुपात नागरीकांसाठी सुरु राहतील. ठोक भाजीमंडई सकाळी ३ ते ६ या कालावधीत सुरु राहील. परंतु सदर भाजी मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांना प्रवेश राहील. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालये, शैक्षणीक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस हे बंद राहतील. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधीत ठिकाणे ही बंद राहतील.