यवतमाळ : गत २४ तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह ३१८ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या २५८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील ७५ वर्षीय महिला आणि यवतमाळ तालुक्यातील ५९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या ३१८ जणांमध्ये २0८ पुरुष आणि ११0 महिला आहेत. यात पुसद १0३, यवतमाळातील ६३ रुग्ण, दिग्रस ५६, वणी २३, बाभुळगाव २२, आर्णि ७, दारव्हा ७, कळंब २, महागाव १0, मारेगाव १, नेर ३, पांढरकवडा ८, उमरखेड ८, राळेगाव १ आणि ४ इतर रुग्ण आहेत. मंगळवारी एकूण १४८२ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ३१८ जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर ११६४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात १९३0 अँक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापयर्ंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १९७४३ झाली आहे. २४ तासात २५८ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १७३२९ आहे. तर जिल्ह्यात एकूण ४८४ मृत्युची नोंद आहे.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024