अमरावती: यक्षदेव कुलभूषण प.पू.प.म. वैद्यराज बाबा यांचा अमृत महोत्सव 18 जानेवारी ते 23 जानेवारीपर्यंत साजरा होत आहे. त्यानिमित्त वाठोडा शुक्लेश्वर येथील श्रीकष्ण मंदिरात भजनसंध्या झाली. प्रा. डाॅ. गजानन केतकर आणि प्रा. वनिता केतकर यांनी सुमधुर भक्तिगीतांनी वातावरणात गोडवा निर्माण केला. या भजनसंध्येचे निवेदन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले.
स्वरश्री केतकर, हृषीकेश सावळे, हर्ष देवघरे यांनी सहगायन केले. कीबोर्डची साथ श्रीनिवास मोहोड, बासरीची साथ रवींद्र खंडारे, तबल्याची साथ प्रसाद पांडे आणि स्वरांग केतकर यांनी केली. ध्वनिव्यवस्था कांडलकर यांनी सांभाळली. संदीप मोरे, नीळकंठ डहाणे, अॅड. अरुण ठाकरे यांचे विशेष सहकार्य लाभले.चल उठ रे मुकुंदा, वैद्यराजबाबा गौरवगीत, संथ वाहते कृष्णामाई, माना मानव वा परमेश्वर, भावनांचा तू भुकेला रे मुरारी, देव देव्हायात नाही, श्रावणात घननिळा बरसला, वृंदावनी वेणू, अरे कृष्णा, आकाशी झेप घे रे पाखरा, मैली चादर ओढ के कैसे द्वार तुम्हारे आऊ अशी एकापेक्षा एक सरस गीतांनी मैफल सजली. कार्यक्रमाच्या समारोपानंतर प.पू.म. वैद्यराजबाबा यक्षदेव यांनी कलावंतांना शाल आणि श्रीफळ देऊन आशीर्वाद दिला.
Related Stories
September 14, 2024
September 8, 2024