मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भारत बंद आंदोलनाला पाठिंबा !
शेतकरी विरोधी कायदे रद्द करून शेतकरी बांधवांना न्याय देण्याची मागनी !
मोर्शी तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात होणार शेतकरी आंदोलन !
मोर्शी : शेतकरी विरोधी कायदे रद्द करून शेतकरी बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समिती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रपती महोदय व पंतप्रधान महोदय यांना तहसीलदार मोर्शी यांचेमार्फत देण्यात आलेल्या निवेदनात केली. तसेच दिल्ली सीमेवर चालू असलेल्या शेतकरी मोर्चास पाठिंबा मोर्शी तालुका संघर्ष समिती तर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला असून मोर्शी तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात शेतकरी आंदोलनात करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कायदे केलेले असून सदर तिन्ही कायदे शेतकरी विरोधी असल्याने देशातील सर्व राज्यांत या कायद्यांना विरोध आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे व सर्व आंदोलनाला शेतकरी फार मोठा प्रतिसाद देत आहे. यावरून दिसून येते कि, सदर कायदे शेतक-यांना मान्य नाही, करिता शेतकरी विरोधी तिन्ही काळे कायदे रद्द करून शेतक-यांना न्याय देण्यात यावा, “केंद्रातील भाजप सरकार दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन बळाच्या जोरावर दडपून टाकू पाहत आहे. शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून, अश्रूधूर सोडून, हायवेवर खड्डे खणून, शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. गेले 4 दिवस लाखो शेतकरी केंद्र सरकारच्या या दडपशाहीला न जुमानता दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन बसले आहेत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन सर्व राज्यांमध्ये आणखी तीव्र करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचे रास्त संरक्षण द्या, केंद्र सरकारने केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, या प्रमुख मागण्या शेतकरी संघर्ष समिती, राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या वतीने करण्यात आल्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचाकल प्रकाश विघे, माजी जी प सदस्य बंडू साऊत, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका प्रमुख हितेश साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष रुपेश वाळके, अतुल उमाळे, दिनेश मिश्रा , दीपक खोडस्कर, विनोद सोनटक्के, प्रशांत उमाळे, निलेश लायदे, संदीप भदाडे, मोरेश्वर गुडधे, अभिजित उमाळे, सुधीर भुयार, प्रदीप सोलव, सिद्धार्थ इंगळे, सुनील चोपडे, आशिष उमाळे, नंदू देशपांडे यांच्यासह आदी शेतकरी व विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या अन्नदात्यांच्या या आंदोलनात राज्यातील जनतेने प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असं आवाहन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या भारत बंद आंदोलनाला शेतकरी संघर्ष समिती, कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी संघटना व समाजसेवी संघटनांनी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.।
शेतकरी विरोधी कायदे रद्द करा .
कमाल जमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तू कायदा , जमीन अधिग्रहण कायदा , हे कायदे शेतकरी विरोधी कायदे रद्द होण्यासाठी शेतकऱ्यांनी लढा देने गरजेचे आहे. जोपर्यंत कायदे रद्द होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, त्यासाठी प्रत्येक किसानपुत्रांने शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी लढा दिला पाहिजे – रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका .
शेतकऱ्याला मुळात स्वातंत्र्य नसल्याने स्वतः पिकवलेला मालाचा भाव मिळण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागतो, ही खुप मोठी शोकांतिका आहे. त्यासाठी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचे रास्त संरक्षण मिळवून द्या, या प्रमुख मागण्या राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या वतीने करण्यात आल्या आहे –नरेंद्र जिचकार अध्यक्ष राष्ट्रवादी काँगेस पक्ष मोर्शी तालुका .