नवी दिल्ली : राज्यांतील निबर्ंध शिथील केल्यानंतर पुढील ३0 ते ६0 दिवसांत देशभरातील नागरिक मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देणार असल्याने लवकरच कोरोनाच्या तिसर्या लाट धडकण्याची शक्यता आहे. कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, लोकल सर्कल्सच्या सर्वेक्षणानुसार, सुमारे ३१ टक्के नागरिकांनी पुढच्या ६0 दिवसात जेवणासाठी रेस्टॉरंटला भेट देण्याचे ठरवले आहे, तर २९ टक्के लोक मॉलमध्ये जाण्याची शक्यता आहे. विस्तारित कुटुंब किंवा मित्र यातील ९0 टक्के लोकांचा यामध्ये समावेश आहे.
या सर्वेक्षणात भारतातील ३१४ जिल्ह्यांमधून ३४,000 पेक्षा जास्त लोकांनी प्रतिसाद दिला आहे. यामध्ये ६६ टक्के पुरुष होते तर ३४ टक्के महिला, ४८ टक्के लोक पहिल्या श्रेणीतील, २७ टक्के दुसर्या श्रेणीतील तर २५ टक्के लोक तिसर्या, चौथ्या आणि ग्रामीण जिल्ह्यातील होते. एप्रिल आणि मेमध्ये बहुतांश भागात बंद असल्याने बरीच रेस्टॉरंट्स आता उघडली आहेत. पुढच्या ६0 दिवसांत यामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. सुमारे १८ टक्के लोकांनी जेवणासाठी रेस्टॉरंट्समध्ये एकदा जाण्याचा पर्याय निवडला आहे तर १३ टक्के लोकांनी अनेक जाणार असल्याचा पर्याय निवडला आहे. सुमारे ५३ टक्के नागरिकांनी अद्याप कोणतीही योजना आखलेली नाही. रेस्टॉरंट्सप्रमाणेच, मॉल्सला देखील परवानगी मिळाल्यानंतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. सुमारे ९ टक्के नागरिकांनी अनेक वेळा मॉल्समध्ये जाणार असल्याचे म्हटले आहे तर २0 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार एकदाच मॉलमध्ये जाणार आहेत. ५२ टक्के नागरिकांनी कोठेही जाणार नसल्याचे म्हटले आहे. म्हणजे एकूणच २९ टक्के नागरिक पुढील ६0 दिवसात मॉलला भेट देणार आहेत. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी होऊ शकते. दैनंदिन आढळून येणार्या रुग्णसंख्येत घट झाली असली तरी लोकांनी घराबाहेर पडण्यावर र्मयादा घालायला हवी. राज्यात अनलॉक झाल्याने अनेक कुटुंबे, मित्र परिवार एकत्र येत असल्याचे दिसत आहे अशी माहिती सरकारी आरोग्य अधिकारी आणि तज्ज्ञांनी दिली आहे.
६३ टक्के नागरिक मॉलला भेट देणार नाही
या सर्वेक्षणात, ६ टक्के नागरिक वस्तू खरेदी करण्यासाठी, ९ टक्के घरगुती खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी, ६ टक्के फिरण्यासाठी, आणि १ टक्के नागरिक सलून आणि स्पासारख्या सेवांचा लाभ घेण्यासाठी जाणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे ६३ टक्के नागरिकांनी ६0 दिवसांत कोणत्याही मॉलला भेट देणार नसल्याचे सांगितले.
Related Stories
October 10, 2024