मुंबई: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने नुकताच राधे: योर मोस्ट वांटेड भाई या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. हा चित्रपट यंदा प्रदर्शित होणार होता पण कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. आता सलमानने चित्रपटाचे उर्वरित शूटिंग पूर्ण केले असून पोस्ट प्रॉडक्शनचे काम जोरात सुरू आहे. त्यानंतर सलमानने त्याचा दुसरा चित्रपट अंतिम: द फाइनल ट्रुथच्या चित्रीकरणास सुरूवात केली. हा चित्रपट मराठीमधील हिट चित्रपट मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
सलमान खानच्या अंतिम: द फाइनल ट्रुथ या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीझरची सुरुवात ही सलमान आणि आयुषच्या फायटींग सीनने होते. दरम्यान दोघेही शर्टलेस असल्याचे पाहायला मिळते. आयुषचा एक वेगळा लूक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
सध्या सोशल मीडियावर हा टीझर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे.
अंतिम: द फाइनल ट्रुथ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकार्याची भूमिका साकारणार आहे तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शूटिंग १६ नोव्हेंबरपासून सुरू झाले होते. त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अंतिम: द फाइनल ट्रुथ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट २0२१मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.
Related Stories
September 3, 2024