सध्याचा जमाना प्रलोभनांचा आहे. त्यात आजकाल शालेय मुलांची देखील स्मार्टफोनची मागणी असते. पण याचे दुष्परिणाम लक्षात घेता मुलांची ही मागणी कधी पूर्ण करायची हे जाणून घ्यायला हवं.
स्मार्टफोनच्या आकर्षणापोटी मुलं कोणतीही सबब सांगतात. एखाद्या प्रोजेक्टसाठी माहिती गोळा करायची, महत्त्वाचा मेसेज करायचा अशी कारणं सांगून स्मार्टफोनची मागणी करतात. अशा वेळी खरं कारण जाणून घ्या. मुलांना स्मार्टफोन वापराबाबत, तोट्यांबद्दल माहिती द्या. जेवताना, अभ्यास करताना अथवा झोपण्याआधी त्यांच्याकडे स्मार्टफोन देऊ नका. किशोरावस्थेतील मुलांना जेवताना वा झोपताना स्मार्टफोन हातात देणं धोक्याचं ठरु शकतं. आपल्याला त्रास होतो म्हणून मुलांना स्मार्टफोनमध्ये अडकवून ठेवणं ही घातक सवय आहे. लहान वयातलं हे व्यसन मुलांना भरकटवू शकतं. स्मार्टफोनवर कोणत्या अँप्स, साईट्सचा उपयोग करुन घेता येईल याबाबत मुलांशी चर्चा करा. हिंसक मजकुरापासून, सोशल मीडियापासून त्यांना दूर ठेवा.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023