मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका महत्त्वाच्या फाईलमध्ये परस्पर फेरफार करत आदेशच फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी एका अभियंत्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. या फाईलमधील मजकूर मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर बदलण्यात आला. ही बाब समोर आल्यानंतर मंत्रालयात खळबळ उडाली असून, याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एका वृत्तानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्या संबंधित फाईलवर सहीदेखील केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर या फाईलमधील मजकूर परस्पर बदलण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर स्वाक्षरीच्या वरच्या भागात लाल शाईने एक अतिरिक्त मजकूर लिहण्यात आला. त्यामध्ये संबंधित अभियंत्याची चौकशी बंद करावी, असा शेरा लिहिण्यात आला होता. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात मुख्यमंत्र्यांची परवानगी अंतिम असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीला महत्त्व असते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर शेरा बदलण्याचे धाडस मंत्रालयातच कुणीतरी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे
Related Stories
September 14, 2024
September 8, 2024