मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. रविवारी दिवसभरात पारा चांगलाच घसरला. सांताक्रुज वेधशाळेने कमाल तापमानाची नोंद २३.८ झाली. जी सुमारे सात अंश सेल्सिअसने कमी झाली आहे. तर किमान तापमानाची नोंद १६ अंश सेल्सिअस इतकी झाली असून हे गेल्या दहा वर्षातील जानेवारी महिन्यातील सर्वात कमी तापमान असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. मुंबईच्या हवेत धूलिकण पसरल्याने मुंबईतील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. पाकिस्तान येथील धुळीचे वादळ गुजरात मार्गे महाराष्ट्रात दाखल झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबईतल्या अनेक भागातील हवेचा दर्जा अत्यंत खालावला आहे. धूलिकणांच्या धुरक्याला मुंबईकरांना आणखी दोन दिवस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवस मुंबईत थंडी कायम राहणार असून तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
- राज्यातही थंडीची लाट
उत्तरेकडील राज्याच्या किमान तापमानात तीन ते चार अंशांनी घट होत असून याचा परिणाम राज्यातील काही भागात होणार आहे. दोन ते चार अंशांनी आणखी तापमानाचा पारा घसरणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
वेधशाळेने नोंदवलेल्या तापमानानुसार राज्यात नाशिक आणि जळगाव येथील पारा सर्वात खाली गेला असून ६.२ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ चिखलठाणा येथे १0.२ इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. बारामती येथे बारा अंशांची नोंद झालेली आहे परभणी येथे १२.९ अंशांची नोंद झालेली आहे. नांदेड येथे १४.६ अंशाच्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. मालेगाव येथे ९.६ अंशांच्या किमान तापमानाची नोंद आहे. पुणे येथे १0.४ अंशाच्या तापमानाची नोंद झाली आहे. माथेरान येथे ७.६ अंशांची नोंद झाली आहे. र%ागिरी येथे १८ अंश सेल्सिअस आणि पणजी येथे २0 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. या आठवड्याभरात तापमानात आणखी एक दोन अंशांची घसरण होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.