- रोटी बोटी देऊन मी
- निवडून आलो होतो
- मीही एकदार राजा
- मोठा मंत्री झालो होतो !!
- पहिल्याच वर्षी राज्या
- तलाव मंजूर केला
- पाणी गेल गा वाहून
- सारा पैसा जमा केला !!
- हरामाच्या कमाईत
- बंगला बांधत होतो
- मीही एकदार राजा
- मोठा मंत्री झालो होतो !!
- ह्या गावच्या भल्यासाठी
- म्या रस्ता मंजूर केला
- कोरया कागदावर तो
- बांधून तयार झाला !!
- अनीतिच्या त्या धनात
- शेती वावर घेत होतो
- मीही एकदार राजा
- मोठा मंत्री झालो होतो !!
- गरीबायच कधी म्या
- राज्या भल नाही केल
- शेतकऱ्यांले सुखान
- कधी जगु नाही देल !!
- गोरगरीबांले लुटून
- तिजोरी भरत होतो
- मीही एकदार राजा
- मोठा मंत्री झालो होतो !!
- अचानकच आमचे
- राम सीताराम झाले
- तन धन खुर्ची पद
- काही संगे नाही आले !!
- खाली हात आलो होतो
- खाली हात गेलो होतो
- कळले आम्ही हा पैसा
- ऊगीचच खात होतो !!
- ऊगीचच खात होतो !!
- वासुदेव महादेवराव खोपडे
- सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
- अकोला 9923488556
—–