वितळेलेले शुध्द सोने मुशीत ओतले की,त्या मुशीचा अाकार त्या सुवर्णास प्राप्त होतो.त्याप्रमाणे मन ज्या वस्तूस व्यापते त्या वस्तूचा आकार ते धारण करते. ज्या गोष्टीबद्दल मन तीव्रतेने विचार करते त्या गोष्टीचे स्वरूप मनाला मिळते.मनाने भगवान शंकराविषयी प्रखर विचार केला तर ते शंकरस्वरुप होते.मन कृष्णाचा अनन्यभावाने विचार करीत असले तर मन कृष्णस्वरुप होते. मन दत्त होऊन सत्याचा सात्विक विचाराने भरून गेला तर स्वतः दत्त एकमुखी होऊन प्रकट होते.मनाला स्वात्विक विचाराचे शिक्षण दिले तर मनातील,ह्दयातील शब्द मुखावाटे वेद होऊन प्रकट होत देवत्वाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहात नाही.आपल्या हातून घडणाऱ्या कृतीचे स्वरूप सात्विक भावनेने असेल तर त्या ब्रम्ह भावना मनाच्या कोंदणात सहज रूजतात. त्यांच्या सोबत राहिलो तर विलक्षण रोमांचकारी अननुभुत असा अनुभव येतो या अलौकिक सानिध्याने जो आघात मनावर होतो त्यामुळे नव्याने मनात प्रेरणा निर्माण होतात अन् त्या तेजोवलयातच्या साह्याने मनाभोवती तेजोमंडळ चकचकीत बनुन चकमकत राहात दूरवर प्रकाशून त्याच्या प्रकाशात जो येईल तो तेजोमय बनून आध्यात्मिक प्रकाशमंडळाचा घटक बनतो.व तो सामर्थ्यवान होतो.हेच खरे अशा सामर्थ्याचा प्रत्यक्ष अनुभव मी कितीतरी वेळा घेतला.अन् या तेजोमंडळाचा प्रकाश सूर्य म्हणजे माझे हदयीस्नेही श्री अरविंद करंबळेकर सर होय.
निपानी पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अलमझरी या छोट्याशा गावचे मुळ रहिवासी मनाने अत्यंत खंबीर,निर्मळ, सहह्दयी, सतत हसत राहात दुस-याच्या मनात स्नेहभावाचा प्रसाद वाटत जगण्याची कला अवगत असलेले सर,विज्ञानाचा विषय शिकवत शिकवत विज्ञानाच्या परिभाषेत पत्रिका कशी बघावी व आपल्या जीवनानुभवाच्या कानसावर घासून निघालेले लख्ख अनुभुवाच्या राशीतून समोरच्या आपलसं करीत कोणत्याही गुरूदक्षिणाची अपेक्षा न करता सांगितलेले उपाय समोरचा हसत हसत ऐकून घेत काही दिवसानी त्याची प्रचीती आल्याचे आवर्जुन सांगत.त्यावेळचे समाधानाच्या अमृतकुंडात तुडुंब बुडालेले सर मी अनेक वेळा पाहिले आहे.
प्रचंड स्मरणशक्ती सर्वांशी प्रेमळपणाने बोलत ,कधी प्रसंग आलाच तर प्रखड बोलून आपणही काही कमी नाही हे दाखवणारे सर,दिवसभर शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेत त्यात रमणारे सर,एकदा मैत्री झाली की, आपले अनुभव सांगून हसवणारे सर,त्यांच्या सहवासात आलेला मोग-याच्या गंधात भोव-यासारखा रमून जातो,आणि माणूसपणाचे गंधात न्हाऊन जातो.
२००७ साली मनात काही निश्चिय करुन सांगलीहून अमलझरीला सर पोहचले. दत्त मंदिराचा छोटासा गाभारा पाहून क्षणभर डोळे पाणावले, मंदिराभोवती वाढलेले गवत, रानफुलांच्या वेली,रानझेंडूची उंचच उंच वाढलेली झाडे,काटेरी झुडुपे, अवतीभोवती पडलेल्या जळाऊ लाकडाचा ढिग,वापरून जुनी झालेली पोती, त्या गवतातून जाणारी छोटीशी पायवाट, समोरचे भव्य प्रवेशद्वार उदास उदास झालेले,डाव्या बाजूस असलेले मारुती मंदिर झाडाच्या, झुडपाच्या, वेलीत लपल्यासारखे दिसत होते.हे सर्व पाहिल्यावर सरांचे मन बेचैन झाले. मनोमन उदास झाले.काय तर करायला हवे .याच स्थितीत असतांना अठ्ठावीस वर्षाचा इतिहास डोळ्यांसमोरुन चित्र फिल्म सरकल्यासारखे सरकू लागले.याच मंदिरात गेलेले जीवन,दिवस आठवू लागले.
कावडीने पाणी भरतांना चिंब भिजलेल्या क्षणांची आठवणी जाग्या होऊ लागल्या.अाजोबांच्या कडक शिस्तीत परवचे, श्लोक म्हणतांना होणारी घालमेल आठवू लागली, याच मंदिरात अभ्यास करतांना साथ देणारा दिवा आठवू लागला.मुनसिपल हायस्कूल ते देवचंद काॅलेजचे दिवस जागे होऊन नाचू लागले.अजानतेपणी प्रथम श्रेणी मिळाल्यावर कळताच होणारा आनंद आठवू लागला.त्यानंतर भोर (पुणे)नंतर सांगली इंथपर्यंतचा प्रवास आठवून मन सुन्न झाले.
सांगलीच्या दिशेने गाडी पळत होती मात्र विचाराची चाके मंदिराभोवतीच फिरत होती.लग्नाच्या निमित्ताने पुण्यास जाण्याचा योग अाला पण तेथेही मनात मंदिर आणि त्याचा परिसर डोळ्यापुढे नाचत होता. सहज बसल्या बसल्या पाहुण्यांना मनोगत व्यक्त केले*” गावी मंदिराचा जीर्णोद्धार करावा म्हणतो”*.अन् चमत्कार व्हावा तसा प्रतिसाद मिळाला जमलेल्या पाहुण्यांनी थोडी निधी सरांच्या हाती देत ठेव, चांगलं कार्य आहे असे शब्द मुखातून येऊ लागले,सरांना कोणीच बोलायची संधी दिली नाही.मनोमन म्हणून मी फक्त विचार करतोय.असे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी अमलझरीला सर पोहचले पण इथपर्यंतचा प्रवास तसा सोपा नव्हता जाग्याची कागपत्रे नव्हती. सुदैवाने साथ मिळत गेली एक एक प्यादे हाती येत गेले.
येथील सा-या हालचाली दूर राहून अप्पा इंगळे पाहत होता.काहीतरी होणार आहे .यात अापण सहभागी व्हावे असे त्याला वाटले.मग एक एक काम होऊ लागले. मंदिराचा मुख्य भाग न हलवता बदल करायचा निश्चय केला. मंदिराचा कळस पायापासून छत्तीस फूट उंच ठेवून कळस चढवला.या वेळी मुलगा सिव्हिल इंजनिअर महेश यांची साथ मोलाची मिळाली त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन केले .आतील भागात मुळ भिंत न पाडता उंची वाढवण्यात आली.पत्रे ऐटीने बसवले, दत्तात्रयाचे भले मोठे चित्र खुद हातानी काढून पाहुण्यांनी दिला.कोणी कासव हाती ठेवले. भर टाकून जमिन समतल केली गेली.मग गावच्या सहभागाने पुढचा सभामंडप बांधण्यात आला.हनुमान मंदिराच्या भोवती फरशी बसवण्यात अाली.पाण्याची सोय ग्रामपंचायतीने केल्यावर पश्चिमेकडील उजव्या बाजूला संडास बाथरूम व पिण्याच्या पाण्याची टाकी बसवण्यात आली.विजेचे दिवे उजळून निघाले.मग साउंडसिस्टिमची सोय होताच गाण्याचे स्वर निनांदू लागले.
हार्मोनियम, तबला,टाळ,चिपळ्या, अभंग यांच्या समवेत वारकरी,भजन गाणारे याच्या स्वरांचा झणकार ऐकू येऊ लागला.गावातील महत्वाच्या सभा,प्रशिक्षण, बैठका होऊ लागल्या.चिमण्यासाठी तांदूळ पाण्याची सोय होताचं ,मंदिरात त्यांचा स्वर गुंजू लागला.समोरच्या बकुळ झाडांना हिरवीगार पालवी फुटून फुलांचा सडा पडू लागला.याच मंदिराच्या दर्शनासाठी लोक हळूहळू येऊ लागले.एखद्या झाडावर सांयकाळी पक्षांचा थवा निवा-यासाठी झेप घ्यावा त्याप्रमाणे अरविंद सरांचे आगमन होताच अवतीभोवती लोक सरांच्या भोवती गोळा होऊ लागले. हातात पेन वही घेऊन सर त्यांच्या समस्या ऐकून त्यांना सल्ले देऊ लागले.तृप्तमनाने लोक मनोमन धन्यवाद देत.त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वलय उमटू लागले. या गावातील बरीच मुले अापणहुन अप्पा इंगळे यांच्या समवेत सरांना विनापेक्षा मदत करु लागली.
संताच्या मनातून निघणारी वैचारिक कंपने व लहरी वातावरणात सातत्याने पसरत असतात.त्या विचार लहरीना आणि त्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या अलौकिक सामर्थ्याला कोण अडवू शकणार? त्यांच्या विशुद्ध, पवित्र, निर्मळा आणि शक्तिशाली विचारलहरी खूप दूरवर पल्ले गाठतात आणि जगाच्या शुध्दीकरणात मोठा हातभार लावतात कारण या विचारलहरी सहस्त्रावधी लोंकाच्या मनात शिरून त्यांच्यावर अनुकूल परिणाम करीत राहतात यात तिळमात्र संशय नाही.
अहो हेच पहा ना अमलझरीतील तरुण पोरं दत्ताचे भक्त बनून सरांच्या सानिध्यात सत्कर्म करीत आहेत हाच बदलच भावी पिढीच्या मनात संस्कृतीची बिजस पेरत हा अरविंद उच्चपदी पहचून मनाच्या,ह्दयाच्या सिंहासनावर कधीच विराजमान झाला आहे.अप्पा इंगळेच्या मृदू बोलण्यात कमालीची लिनता,आदरभाव,आपलेपणा,सच्चाई ओतप्रोत भरलेली दिसेल गावातील मुलांच्या मदतीने अरविंद सर प्रभावित होऊन प्रत्येकाला एक एक घड्याळ देऊ केले. त्याही मुलांनी नम्रपणे त्याचा स्विकार केला तुम्हास त्यांची नावे जाणून घेण्याची इच्छा असेल तर ही नावाची यादीच सरांचा प्रभाव, भक्तभावाची कल्पना येईल*.विलास सुरेश इंगळे,कुमार महादेव कंकनवाडे,दादा वसंत पाटील,युवराज भीमराव कंकनवाडे,सुरज महादेव पाटील,नयन रामा रेपे,दत्ता कृष्णा पाटील,सतीश मनोहर कंकनवाडे,अमर मारुती रेपे,अतुल शाम कोकरे,सनी शिवाजी देसाई, मल्लू रामा कंकनवाडे,आप्पा रामा लुगडे,अमोल अनिल कोकरे,बंडा दत्ता कदम,आशिष आप्पा खोत,प्रमोद शामा खोत,गणेश सुनिल कदम,सतीश अशोक खोत,यशवंत दत्ता ढापळे,हरी दत्ता रेपे,प्रथमेश सुनिल कदम,बाळू रघुनाथ खोत,वसंत बंडू रेपे,शांताराम कांबळे,मारुती कांबळे, परशराम पुजारी, अभिजीत शशिकांत कौंदाडे, आप्पा सुरेश इंगळे,चंद्रकांत महादेव खोत *या मुलांच्या मनात सरांनी संस्काराची रूजवण केली.
आपण आपल्या कृतीचे बीज पेरतो आणि सवतीचे फळ त्यातून उत्पन्न करतो सवय नामक बीजाचे रोपण केले तर चारित्र्य, स्वभाव,किंवा नशीब नावाच्या फळाची प्राप्ती होते दैव अनुकूल करुन घेऊन अप्रकट सामर्थ्याला प्रकट करुन त्याचा उपयोग केला तर अलौकिक कार्य सिध्दीस जाते ते कार्य म्हणजे अमलझरी येथील दत्त मंदिरात ब्लाँक बसवून केलेले थोर कार्य अाणि बसवण्याचे काम करणारा त्याचे पहिलेच काम असल्याने तोही विनामोबदला काम करतोय.असा अलौकिक बदल घडविणाऱ्या सरांना लाख लाख मानवंदना. सर्वांना दीर्घायुष लाभले हीच प्रार्थना दत्तात्रयाना करतो.सरांच्या कर्तबगारांचा सूर्य असाच तळपत राहो हीच सदिच्छा!
- -मुबारक उमराणी
- सांगली
- ९७६६०८१०९७