मराठी काव्य प्रांतात अनेक काव्य प्रकार रूजू झाले आहेत . त्यात उर्दू मधुन मराठीत आलेली गझल . आज तरूण लेखकांच्या मनावर गारूड करते आहे .कवीवर्य सुरेश भट यांच्या नंतर अनेक कवींनी गझल हा काव्य प्रकार सक्षक्त पणे हाताळलेला आहे. त्यात माझे कवी मित्र संदिप वाकोडे यांचे नाव आर्वजून घ्याव लागेल . नव्या पिढीतले अतिशय दमदार गझलकार म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्राला ते परीचीत आहे .
नुकतेच स्थानिक मुर्तिजापूर येथे कलाविष्कार संस्थेच्या वतीने त्यांचा “किनारा ” या गझल संग्रहाचा प्रकाशन समारंभ अगदी थाटात मान्यवरांच्या शुभहस्ते सानंद संपन्न झाला . या नेत्रदिपक सोहळ्याचा मी स्वतःही साक्षीदार आहे .
त्या अनुषंगाने मला आज त्यांचा ” किनारा” हा गझलसंग्रह वाचायला मिळाला .गेल्या काही वर्षात “गझलदीप प्रतिष्ठानच्या” वतीने माझे मित्र संदीप वाकोडे यांनी स्थानिक मुर्तिजापूर येथे एक सशक्त चळवळ उभी केली आणि आज माझ्या अकोल्या जिल्हासहआपल्या सशक्त चळवळीने संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला त्यांचा आम्हा मुर्तिजापूरकरांना सार्थ अभिमान आहे .
जेवढी चळवळ सशक्त तेवढी त्यांची गझल ही सशक्त हे त्यांचा ” किनारा” हा गझल संग्रह वाचतांनाच कळून येते . त्यांच्या गझल संग्रहातले काही शेर नक्कीच काळजावर ठसा उमटवणारे आहेत . असे म्हणतात की गझलेचा प्रत्येक शेर हा एक स्वतंत्र कविताच असते. गझल संग्रह वाचतांना मला भावलेली एक गझल मी इथे देत आहे .
* किर्तिवंत *
दिसावया देह आपला शेभिवंत आहे
तरी कसा कापरापरी नाशिवंत आहे
सदैव घेतो लिहावयाला व्यथा जगाची
कवी असा तो खराखुरा जातीवंत आहे
फुलून येते मनातले चांदणे रुपेरी
मिठीतला चंद्रमा जणू मुर्तिमंत आहे
लुबाडला देश आमचा केवढया खुबीने
फरार तो चोरटा तसा किर्तिवंत आहे
नको विचारू गड्या मला अर्थ गझलचा तू
तिच्याचसाठी उरात ठोका जिवंत आहे
आज त्यांचा ” किनारा” हा गझल संग्रह वाचून खूप आनंद झाला.समग्र प्रकाशनच्या वतीने केवळ १५०/- रू किमंत असलेला हा गझल संग्रह विष्णु थोरे यांच्या मुखपृष्ठाने अतिशय आकर्षक झाला आहे. आमचे दादा गझलनवाज पं,भिमराव पांचाळे यांनी केलेली गझल संग्रहाची पाठराखण , मलपृष्ठावरील त्यांचे दोन शब्द अतिशय महत्वाचे आहे .म्हणूनच हा गझल संग्रह प्रत्येकाने संग्रही ठेवावा असाच आहे .
खरतर काव्य प्रांतात इतरान सह माझे ही योगदान असले तरी मी अदयापही गझलेच्या प्रांतात “किनाऱ्यावर ” पोहचू शकलो नाही . पण गझल मात्र नेहमीच माझ्या हृदयाचा ठाव घेत आलेली आहे. याच अनुषंगाने मित्रवर्य संदीप वाकोडे यांना गझल लिखानासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि गझल चळवळीच्या पुढील वाटचालीस सुयश चिंतीतो.
स्नेहकांक्षी
कवी , प्रमोद पंत
9763015600