पुणे : पुण्यात अनेक नेते घडले. एखादी चांगली गोष्ट घडली की त्याचे नाते पुण्याशी जोडले जाते. पुणे हे सर्वार्थाने प्रगतीचे शहर आहे. प्रत्येकाला अस वाटते की पुण्यामध्ये सेटल झाले पाहिजे. पण मी कोल्हापूरला परत जाणार हे माझ्या विरोधकांनाही सांगा, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
अटल संस्कृती पुरस्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी पद्मश्री रघुनाथ माशेलकर यांना अटल संस्कृती पुरस्कार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मुळचे कोल्हापुरचे असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातून विधानसभा निवडणूक लढविली आणि भाजपसाठी सुरक्षित अशा कोथरुड मतदारसंघातून ते निवडून आले. त्यांनी आता कोल्हापूरला परत जाणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वतरुळात चर्चेला उधाण आले आहे.
मी कोणतीही निवडणूक हरलेलो नाही. कोल्हापूरमधून कधीही लढण्यास तयार आहे. तिथून निवडून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात जाईन, असे आव्हान पाटील यांनी याआधी टीकाकारांना दिले होते.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024