- आयुष्यभर सेवा केली
- निस्वार्थपणे देशाची
- सारंच दान करून गेले
- नव्हती हाव कशाची
- गाडी नाही बंगला नाही
- नाही घेतली शेती वाडी
- कपाट भरून पुस्तकाची
- एवढीच शिल्लक माडी
- झोपेत पडणारी स्वप्ने
- खरी कधीच नसतात
- डोळे बंद असतानाही
- झोप लागू देत नसतात
- अग्निपंख पसरूनिया
- अंतरिक्षा गरुड भरारी
- अग्नी एक दोन तीन
- स्वभावच होता करारी
- बहुमोल असा हिरा होता
- होता खरा भारत रत्न
- समजून घ्यावा अब्दुल
- वाचण्याचा करावा यत्न
- भारताचा मिसाईल मॅन
- आझाद देशाचा कलाम
- चला मुलांनो करूयात
- वाचन प्रेरणा दिनी सलाम
- -पी के पवार
- सोनाळा बुलढाणा
- ९४२१४९०७३१
—–