मुंबई: भारताचे महान माजी धावपटू आणि फ्लाईंग सिख अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण देशभरातून दु:ख व्यक्त केले जातेय. १९५८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २00 आणि ४00 मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावणारे मिल्खा सिंग हे पहिले भारतीय ठरले होते. मिल्खा सिंग यांचा हा विक्रम ५0 वर्षांहून अधिक काळ कायम राहिला. मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर देशातील विविध स्तरांतून त्यांना र्शद्धांजली वाहिली जातेय. बॉलिवूडमधील देखील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केलाय.
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट करत मिल्खा सिंग यांच्या निधानाचे दु:ख व्यक्त करत त्यांना र्शद्धांजली वाहिली आहे. दु:खात.मिल्खा सिंग यांचे निधन .भारताचा अभिमान . एक उत्तम धावपटूएक महान व्यक्ती.त्यांच्यासाठी प्रार्थनाह्व असं म्हणत बिग बी अमिताभ बच्चन यांनी र्शद्धांजली वाहिली आहे.
तर अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील ट्विटरवर पोस्ट शेअर करत मिल्खा सिंग यांच्या कुटुबियांचं सांत्वन केलंय. प्रेमाने स्वागत करत तुम्ही आपली पहिली भेट अगदी खास केली होती. आपल्या देशासाठी केलेल्या योगदानामुळे, तुमच्या कर्तृत्वामुळे आणि विनम्रतेमुळे मी प्रेरित झाले आहे. ओम शांती मिल्खा जी. असं म्हणत प्रियांकाने तिच्या पोस्टमधून मिल्खा सिंग यांच्या कुटुंबियांचं सांत्वनदेखील केलंय.
अभिनेता शाहरुख खान आणि अक्षय कुमारने देखईल एक ट्वीट करत मिल्खा सिंग यांच्या निधनाचं दु:ख व्क्त केलंय.
मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर शाहरुख खानने एक पोस्ट शेअर केलीय. यात तो म्हणाला, फ्लाईंग सिख कदाचित यापुढे आपल्यासोबत नसतील मात्र त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा अतुलनीय वारसा कायम आपल्यासोबत असेल. माझ्यासह लाखो लोकांसाठी ह्व अशा आशयाची पोस्ट शाहरुखने केली आहे.
तर अभिनेता अक्षय कुमारने देखील एक पोस्ट शेअर केलीय, मिल्खा सिंग यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दु:ख झाले. त्यांची भूमिका न साकारल्याचे दु:ख मला कायम लक्षात राहिल. तुम्ही स्वर्गात सुवर्ण धाव घ्या. फ्लाईंग सिख, ओम शांती. अशी पोस्ट करत अक्षयने दु:ख व्यक्त केलं. तसचं भाग मिल्खा भाग या सिनेमात मिल्खाही भूमिका न साकारल्याचा खेद वाटत असल्याचं तो म्हणालाय. शाहरुख आणि अक्षयसोबतच अनेक सेलिब्रिटींनी मिल्खा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना कोकरोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यानंतर त्यांना पीजीआयएमईआर चंदीगडमध्ये दाखल केले गेले. मिल्खा सिंग यांनी आपल्या कामगिरीने जगाच्या नकाशावर भारताचे नाव कोरले. १९५९मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Related Stories
October 10, 2024