मुंबई: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत बिघडल्याने आगामी द काश्मीर फाइल्स या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले. नोव्हेंबरपासून मसूरी या ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. शनिवारी आऊटडोअर शूटिंगदरम्यान मिथुन चक्रवर्ती अचानक सेटवर कोसळले. त्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी लगेच चित्रपटाचे शूटिंग थांबवले.
चित्रपटातील साहसदृश्याचे शूटिंग सुरू होते आणि मिथुन सरांच्या भूमिकेला विशेष महत्त्व होते. मात्र फूड पॉइझनिंगमुळे त्यांना उभेसुद्धा राहता येत नव्हते. थोडा वेळ ब्रेक घेऊन त्यांनी त्यांचे शूटिंग पूर्ण केले. त्यांना आराम करण्याची खूप विनंती केली पण चाळीस वर्षांहून अधिक करिअरमध्ये कधीच कोणत्या चित्रपटाच्या सेटवर आजारी पडलो नसल्याचे त्यांनी मला सांगितले. काहीही झाले तरी शूटिंग थांबले नाही पाहिजे यावर ते ठाम होते, असे विवेक अग्निहोत्री म्हणाले. मिथुन चक्रवर्ती यांच्यावरील भागाचे शूटिंग झाल्यानंतर त्या दिवसाचे काम बंद करण्यात आले.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023