कोरोना विषाणूमुळे मास्क घालणं आयुष्याच भाग बनून गेलं आहे. न्यू नॉर्मल असं म्हणत आपण मास्क स्वीकारलं आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणं आवश्यक असलं तरी याचे बरेच दुष्परिणाम दिसून येतात. बराच वेळ मास्क घालणार्यांना त्वचेशी संबंधित आजार होतात. इतकंच नाही तर आता मास्कमुळे डोळ्यांशी संबंधित तक्रारी वाढू लागल्या आहेत. बराच काळ मास्क घातल्यानंतर डोळ्यांमध्ये होणारी जळजळ ही सर्वसामान्य बाब बनून गेली आहे. चुकीच्या पद्धतीने मास्क घातल्यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मास्क चुकीच्या पद्धतीने घातल्यास किंवा नाक उघडं राहिल्यास उच्छवासावाटे बाहेर पडणारी उष्ण हवा डोळ्यात जाऊन डोळे कोरडे पडतात. या हवेमुळे नैसर्गिक अर्शू वाळून डोळ्यांचा दाह होतो.
मास्क बराच काळ घातल्यानंतर पापण्यांलगतचा जंतूसंसर्ग, बुब्बुळांचं होणारं नुकसान, मास्कवर राहिलेल्या साबणाच्या कणांमुळे डोळे खाजणं अशा समस्या घेऊनही रुग्ण येत आहेत. कोरोना महामारीच्या काळातला ताण आणि काळजी यामुळेही डोळ्यांच्या समस्या उद्भवत असल्याचंही तज्ज्ञ सांगत आहेत.
डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी मास्क नीट घाला. मास्कने फक्त तोंड झाकणं, सैल मास्क घालणं यामुळे नाकातून बाहेर पडणारी गरम हवा अगदी सहज डोळ्यांपर्यंत पोहोचते आणि त्रास सुरू होतात. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क मिळतात.
Related Stories
September 3, 2024